जम्मू-काश्मीरमधील विदेशी गुंतवणूक शिखर परिषदेत संयुक्त अरब अमिरातचा सहभाग

श्रीनगर – संयुक्त अरब अमिरात येथील गुंतवणूकदारांच्या ३१ सदस्यीय शिष्टमंडळाने जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर येथे झालेल्या विदेशी गुंतवणूक शिखर परिषदेत सहभाग घेतला. जम्मू-काश्मीरमध्ये विविध क्षेत्रात गुंतवणुकीची क्षमता आहे. अशी गुंतवणूक भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यासाठी, विशेषतः काश्मीरसाठी लाभदायी आहे, असे या गटाचे नेतृत्व करणारे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला महंमद युसुफ यांनी सांगितले.

सौदी अरेबिया, कतार, ओमन, कुवेत आणि बहारीन या ‘गल्फ कोऑपरेशन काऊन्सिल’च्या देशांना गुंतवणुकीसाठी जम्मू-काश्मीरमध्ये निमंत्रित केले जाईल, असेही सांगण्यात आले.