भारताने प्रथमच एका वर्षात केली ४०० बिलियन डॉलर्सची निर्यात !

नवी देहली – ‘आत्मनिर्भर भारता’च्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या बळावर आर्थिक वर्ष २०२१-२२ संपायच्या ९ दिवस आधीच भारताने ४०० बिलियन डॉलर्सची (३० सहस्र ५४० कोटी रुपयांहून अधिक रकमेची) निर्यात केल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. गतवर्षी हा आकडा २९२ बिलियन डॉलर्स होता, तर २०१८-१९ या आर्थिक वर्षात आतापर्यंतची सर्वाधिक, म्हणजे ३३०.०७ बिलियन डॉलर्सची निर्यात करण्यात आली होती.