३१ जानेवारीला सूर्याची किरणे श्री महालक्ष्मीदेवीच्या किरिटापर्यंत पोचली !

देवीचे मुखकमल उजळून देवीच्या किरिटाच्या वरपर्यंत हे सूर्यकिरण पोचले. त्यामुळे या वर्षातील उत्तरायणातील किरणोत्सव पूर्णक्षमतेने झाला.

‘अ‍ॅमेझॉन’कडून भारताचे मानचित्र (नकाशा) आणि राष्ट्रध्वज यांचा सातत्याने अवमान !

‘अ‍ॅमेझॉन’वर त्वरित कारवाई करा ! हे सांगावे का लागते ? पोलीस, प्रशासन आणि सरकार यांनी ते स्वतःहून करणे अपेक्षित आहे !

तेलंगणातील नलगोंडा शहरवासियांच्या दिवसाचा प्रारंभ राष्ट्रगीताने होतो !

राष्ट्रभक्ती वाढवण्यासाठी प्राथमिक टप्प्यावर हा उपक्रम नक्कीच चांगला आहे; मात्र त्याही पुढे जाऊन राष्ट्रविरोधी कृती होत असतांना त्या वैध मार्गाने रोखण्यासाठी नागरिकांनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे. त्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करणे आवश्यक !

काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांच्यावर शाई फेकणार्‍या तरुणाला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अमानुष मारहाण

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ‘गांधीगिरी’ ! हिंदूंना ‘भगवा आतंकवादी’ ठरवणारे काँग्रेसवाले त्यांच्यावर कुणी शाई फेकली, तर कायदा हातात घेतात अन् गांधी यांच्या ‘अहिंसा’, ‘सविनय’ या तत्त्वांना पायदळी तुडवतात, हे लक्षात घ्या !

भाजपच्या झेंड्यावर गायीला झोपवून तिची हत्या करणार्‍या तिघा धर्मांधांना अटक

हिंदूंना असहिष्णू ठरवणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांची तोंडे आता का बंद आहेत ? प्राणीमित्र संघटना कुठे आहेत ?

लावण्याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआय करणार !

मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाचा आदेश

गुजरातमध्ये सीमा सुरक्षा दलाकडून पाकिस्तानी मासेमाराला अटक !

कच्छच्या क्रीक सीमेवरून एका पाकिस्तानी मसेमाराला अटक करण्यात आली असून त्यासह ३ नौकाही कह्यात घेण्यात आल्या आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पहारा देत असतांना ही कारवाई केली.

बेंगळुरूच्या क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा रेल्वे स्थानकावर धर्मांधांकडून अनधिकृत प्रार्थनास्थळाची निर्मिती !

हिंदूंनी अशा प्रकारे कधी रेल्वे स्थानकाच्या परिसरात प्रार्थनास्थळाची निर्मिती केल्याचे एकतरी उदाहरण आहे का ? हिंदूंना रेल्वे प्रशासन असे करू तरी देईल का ?

पेशावर (पाकिस्तान) येथे एका पाद्य्राची गोळ्या झाडून हत्या, तर दुसरा पाद्री घायाळ

पाकमध्ये अल्पसंख्यांकांचा होणारा वंशसंहार थांबवण्यासाठी जगाने पुढाकार घेणे आवश्यक !

मालदीवमध्ये भारतविरोधी घोषणा दिल्यास ६ मास कारावास अन् दंडही होणार !

मालदीवचे माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामिन यांच्या ‘इंडिया आऊट’ मोहिमेमुळे भारतासमवेतचे मालदीवचे संबंध विकोपाला जातील, अशी शक्यता असल्याने मालदीव सरकार भारताला पाठिंबा दर्शवणारे नवीन विधेयक घेऊन येत आहे.