कररचनेमध्ये कोणताही पालट नसणारा अर्थसंकल्प !

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी १ फेब्रुवारी या दिवशी लोकसभेत वर्ष २०२२ चा अर्थसंकल्प सादर केला. भारतीय सर्वसामान्य जनतेला यावर्षी कररचनेमध्ये पालट होण्याची अपेक्षा होती; मात्र त्यात निराशाच पदरी पडल्याचे या अर्थसंकल्पात दिसून आले.

छोटा उदयपूर (गुजरात) येथे धर्मांधांकडून मंदिरात किशन बोलिया याच्या श्रद्धांजलीसाठी उपस्थित हिंदूंवर आक्रमण !

गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर धर्मांधांकडून सातत्याने होणारी आक्रमणे, तसेच हिंदूंच्या हत्या होणे या घटना हिंदूंना अपेक्षित नाहीत !

कॅनडातील ट्रकचालकांच्या आंदोलनावरून सामाजिक माध्यमांतून कॅनडाच्या पंतप्रधानांवर भारतियांकडून टीका !

कॅनडात कोरोना लसीकरणाच्या संबंधी अध्यादेशाच्या विरोधात ट्रकचालकांच्या चालू असलेल्या आंदोलनाचे प्रकरण
पंतप्रधान ट्रुडो यांनी शेतकरी आंदोलनावरून भारताचा केला होता विरोध !

… तर रशियाला गंभीर परिणाम भोगावे लागतील ! – अमेरिका

अमेरिकेचा युक्रेन प्रश्‍नावरून रशियाला इशारा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या ७४ वर्षांच्या काळात बहुतेक सर्व राजकीय पक्षांनी भारताची खरी प्रगती केलीच नाही, उलट सर्व अधार्मिक आणि नीतीशून्य विषयांत भारताने प्रगती केली आहे !’

‘कोव्हॅक्सिन’ची नाकावाटे घेण्याची लस वर्धक मात्रा (बूस्टर डोस) म्हणून देण्यात येणार !

तज्ञांच्या मते इंजेक्शनद्वारे दिल्या जाणार्‍या लसी या कोरोनाची तीव्रता अल्प करण्यास लाभदायक असल्या, तरी पूर्णपणे प्रतिबंधात्मक नाहीत. नाकावाटे दिली जाणारी लस ही कोरोनासारख्या विषाणूपासून प्रतिबंध करण्यास अधिक कार्यक्षम असेल.

हिंदुद्वेषी आणि राष्ट्रघातकी अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना अप्रत्यक्षपणे खलनायक दाखवण्याचा प्रयत्न

भारतात लोकशाही असल्यामुळे कुणीही कुणावरही टीका करू शकतो; मात्र त्यात संयतपणा हवा. मोदीद्वेषापायी शाह यांच्यासारखे कथित निधर्मीवादी विवेक गमावून बसले आहेत, हेच यातून दिसून येते !

‘पद्मावत’ आणि ‘जोधा अकबर’ या चित्रपटांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य अन् ‘नथुराम गोडसे’ यांच्या चित्रपटाला विरोध, हा गांधींचा विश्वासघात !

‘व्हाय आय् किल्ड गांधी ?’ या चित्रपटाला काँग्रेस, गांधीवादी आणि काही पुरोगामी मंडळी यांच्याकडून विरोध केला जात आहे. या विरोधातील ढोंगीपणा उघड केला आहे.

सर्व संत आणि संघटना यांनी हिंदु राष्ट्रासाठी एकत्र येऊन कार्य करण्याची नितांत आवश्यकता ! – संतांचे सामायिक मत

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील माघ मेळ्यात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संत संपर्क अभियान !

२ जिल्हे वगळता राज्यात कोरोनाची तिसरी लाट शिखरावर ! – तज्ञांचे मत

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेने सर्वोच्च शिखर बिंदू केव्हाच गाठला असून आता लाट उतरणीला लागल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २९ जानेवारीला घोषित केले; परंतु राज्याच्या कोरोना कृती दलाने हे अमान्य केले आहे.