भाजपच्या झेंड्यावर गायीला झोपवून तिची हत्या करणार्‍या तिघा धर्मांधांना अटक

हिंदूंना असहिष्णू ठरवणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांची तोंडे आता का बंद आहेत ? प्राणीमित्र संघटना कुठे आहेत ? – संपादक

(प्रतिकात्मक छायाचित्र)

इंफाळ (मणीपूर) – मणीपूर राज्यातील लिलोंग पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अब्दुल रशीद, नजबुल हुसैन आणि महंमद आरिफ खान यांना गोहत्येच्या प्रकरणी अटक केली आहे. यात काही जणांकडून गोहत्या करण्यात येत असल्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. हे तिघेही भाजपच्या ध्वजावर गायीला झोपवून तिची हत्या करत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. तसेच हे लोक मणीपूरचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते एन्. बीरेन सिंह अन् भाजपच्या प्रदेशाध्यक्षा सारदा देवी यांना शिवीगाळ करतांना दिसत आहेत.