लावण्याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआय करणार !

मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाचा आदेश

मदुराई (तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने लावण्या या १२ वीत शिकणार्‍या विद्यार्थिनीच्या आत्महत्येचे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे अर्थात् सीबीआयकडे सोपवले आहे. लावण्याच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हा आदेश दिला. या याचिकेत लावण्याच्या वडिलांनी म्हटले होते की, माझा तंजावरच्या पोलिसांच्या चौकशीवरील विश्‍वास उडाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला किंवा अन्य यंत्रणांना देण्यात यावी, अशी माझी मागणी आहे.

तंजावर येथील सेक्रेड हार्ट हायर सेकेंडरी शाळेत लावण्या शिकत होती. तिला शाळेमधून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास दबाव आणला जात होता. तिने धर्मांतरास नकार दिल्याने तिचा छळ करण्यात येत होता. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली. तिने मृत्यूपूर्वी दिलेल्या जबानीतही ही माहिती दिली आहे.