गुन्हे नोंद करा; मात्र शिवजयंतीची मिरवणूक निघणारच ! – रविकिरण इंगवले, शिवसेना

जर प्रशासन आडमुठेपणा आणि चुकीच्या नियमांच्या आधारे अनुमती नाकारत असेल, तर शिवाजी पेठेसाठी अन् छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी अनेक गुन्हे अंगावर घेण्यासाठी मी सिद्ध आहे.

संजय राऊत यांच्या पोकळ धमक्यांना भाजप घाबरत नाही ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

महाविकास आघाडी सरकारने अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्जाची मर्यादा साडेसात लाखांपर्यंत वाढवली.पण मराठा युवकांसाठी दिली जाणारी १० लाख रुपये बिनव्याजी कर्जाची योजना ठप्प केली.

आशासेविकांना ५ मास मानधन न मिळाल्यामुळे त्यांचा जिल्हा परिषदेवर लाटणे मोर्चा !

आशासेविकांना मानधनासाठी मोर्चा का काढावा लागतो ? प्रशासन स्वतःहून का लक्ष देत नाही ?

सोनीपत (हरियाणा) येथे मौलवीकडून उर्दू शिकण्यास येणार्‍या ७ वीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार

एका मुलीवर नूर इस्लाम या मौलवीने बलात्कार केला. मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर मौलवीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हिजाबची मागणी करणार्‍यांचे आजोबा पाकमध्ये गेले असते, तर त्यांना हिजाब सहज मिळाला असते ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

त्यांच्या आजोबांनी (फाळणीच्या वेळी) पाकिस्तानला जाण्याऐवजी भारतात रहाण्याचा निर्णय का घेतला ?

पाकिस्तानमध्ये ८२ टक्के मुलींवर कुटुंबातील सदस्यांकडून बलात्कार होतात ! – पाकिस्तानी महिला अधिवक्ता

पाक तसेच अन्य इस्लामी देशांमध्ये मुली लहान वयापासून हिजाब, बुरखा आदी परिधान करतात. ‘असे असतांनाही तेथे बलात्काराचे प्रमाण अधिक का ?’,

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून हिजाबच्या समर्थनार्थ विनाअनुमती आंदोलन करून पोलिसांशी असभ्य वर्तन

विनाअनुमती आंदोलन करण्याचे धर्मांधांचे पुन्हा धाडस होऊ नये, यासाठी त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !

७६५ विचारवंतांकडून खुले पत्र लिहून हिजाबचे समर्थन !

या विचारवंतांना काश्मीरमध्ये हिंदूंच्या वंशसंहाराविषयी, त्यांच्या पुनर्वसनाला जिहाद्यांकडून होत असलेल्या विरोधाविषयी आणि देशात विविध ठिकाणी हिंदूंवर धर्मांधांकडून होत असलेल्या आक्रमणाविषयी अनावृत्त पत्र लिहावेसे का वाटले नाही ?, याचे उत्तर ते देतील का ?

‘नाटो’चा सदस्य बनणे, हाच युक्रेनसमोर एकमेव पर्याय ! – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की

आमच्यासाठी ‘नाटो’चा सदस्य देश बनणे वाटते तितके सोपे नाही, असेही झेलेन्स्की यांनी सांगितले.

कोटा (राजस्थान) येथे काँग्रेस सरकारकडून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेच्या फेरीला अनुमती

काँग्रेस हिंदूंना आणि त्यांच्या संघटनांना ‘भगवा आतंकवादी‘ ठरतवते, तर दुसरीकडे जिहादी संघटनांना डोक्यावर बसवते, हे लक्षात घ्या !