सर्वोच्च न्यायालयाने नीतेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख आणि शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या आक्रमणाच्या प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत त्यांना जिल्हा न्यायालयात शरण येण्यासाठी १० दिवसांचा अवधी दिला आहे.