इलेक्ट्रिक गॅससाठी सरकारने अनुदान न दिल्यास बेकरी उत्पादनांच्या किमतीत वाढ होणार !
मुंबई – बेकरीच्या भट्टीमधून बाहेर पडणार्या धुरामुळे मुंबईतील प्रदूषण वाढत आहे. यामुळे मुंबई महापालिकेने बेकर्यांना नोटिसा पाठवल्या आहेत.
१. मुंबईतील निम्म्याहून अधिक बेकर्यांमधील भट्ट्यांमध्ये लाकडाचा वापर केला जातो. त्यामुळे प्रदूषण वाढते. ‘सर्व बेकरी चालकांनी इलेक्ट्र्रिक किंवा गॅस पाईपलाईनचा वापर करावा, अन्यथा बेकरी बंद करण्यात येईल’ असे नोटिशीत म्हटले आहे.
२. काही बेकरी चालकांनी इलेक्ट्रिक किंवा गॅस पाईपलाईन बसवण्यासाठीच्या खर्चामध्ये सरकारने अनुदान द्यावे, अन्यथा बेकरी उत्पादनांच्या किमतीत वाढ करावी लागेल, असे सांगितले आहे.
३. मुंबईत प्रतिदिन जवळपास ५ कोटी पाव लागतात. लहान बेकर्यांमध्ये प्रतिदिन सुमारे १०० किलो लाकूड इंधन म्हणून वापरले जाते, तर मोठ्या बेकर्यांमध्ये २५० ते ३०० किलो लाकूड इंधन म्हणून वापरले जाते. जेव्हा भंगार लाकूड हे इंधन म्हणून वापरले जाते, तेव्हा मिथेन, कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनॉक्साईड यांसारखे हानीकारक वायू बाहेर पडतात. त्यातून श्वसनाचे आजार आणि दमा यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात.