मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील शिवमंदिराबाहेर एका प्राचीन विहिरीचे उत्खनन

हिंदू अल्पसंख्य झाल्याने मुसलमानांनी बुजवली होती विहीर !

शिवमंदिराबाहेर असणारी एक प्राचीन विहीर

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथील शिवमंदिराबाहेर असणारी एक प्राचीन विहीर प्रशासनाकडून खोदण्यात येत आहे. या भागात पूर्वी हिंदु बहुसंख्य होते; मात्र त्यांनी येथून स्थलांतर केल्याने मुसलमानांनी ही विहीर बुजवली होती. या प्रकरणी हिंदूंनी केलेल्या तक्रारीनंतर उपजिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने विहीर पुन्हा खोदण्यात येत आहे. ४ तास  खोदल्यानंतर विहीर सापडली. पोलीस अधिकारी विनोद कुमार म्हणाले की, गावात पूर्ण शांतता आहे. कोणत्याही प्रकारचा वाद नाही.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या अशा किती वास्तूंवर मुसलमानांनी नियंत्रण मिळवले आहे किंवा त्यांना नष्ट केले आहे, याचा शोध घेऊन त्याचा इतिहास जनतेसमोर आणलाच पाहिजे ! यातून धर्मनिरपेक्षतेच्या आणि सर्वधर्मसमभावाच्या आत्मघाती गांधीगिरीमुळे हिंदूंची झालेली हानी जगाच्या लक्षात येईल, तसेच सत्य इतिहासातून वास्तविक धर्मनिरपेक्षतेचा अंगिकार होऊन लोकशाही खर्‍या अर्थाने सशक्त होईल !