Prayagraj Kumbh Parva 2025 : महाकुंभमेळ्यातून २ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली माहिती

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – महाकुंभामध्ये ४० कोटींहून अधिक भाविक येणे अपेक्षित आहे. यातून २ लाख कोटी रुपयांपर्यंत महसूल वाढण्याचा अंदाज आहे, असे उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ते एका संमेलनात बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की,

वर्ष २०१९ च्या प्रयागराज अर्धकुंभाच्या आयोजनाने राज्याच्या अर्थव्यवस्थेत १ लाख २० सहस्र कोटी रुपयांचे योगदान दिले होते. आताच्या कुंभमेळ्यातून आर्थिक विकासात २ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे. एवढेच नाही, तर वर्ष २०२४ मध्ये जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत वाराणसीमध्ये काशी विश्‍वनाथाच्या दर्शनासाठी १६ कोटींहून अधिक भाविक आले, तर अयोध्येत १३ कोटी ५५ लाखांहून अधिक भाविक आले.

ते पुढे म्हणाले की, या महाकुंभमेळ्यामुळे जागतिक पातळीवर भारताच्या प्राचीन सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांना महत्त्व मिळेल. याचे आयोजन म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नाही, तर सामाजिक आणि आध्यात्मिक एकतेचे प्रतीकही आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या धार्मिक उत्सवातून इतक्या मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो, यावरून धार्मिक उत्सवांचे आध्यात्मिकतेसह आर्थिक महत्त्व किती आहे, हे लक्षात येते !