प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्‍वभूमीवर देहलीच्या गाझीपूरमध्ये सापडली स्फोटके !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही प्रजासत्ताकदिन जिहादी आतंकवादाच्या सावटाखाली साजरे करावे लागणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक

स्फोटके सापडल्याचे स्थळ

नवी देहली – देशाचा ७२ वा प्रजासत्ताकदिन अवघ्या काही दिवसांवर आलेला असतांना राजधानी देहलीतील गाझीपूर येथील फुलांच्या बाजारामध्ये ‘आयइडी’ (इम्प्रोवाइस्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस) स्फोटकांनी भरलेली एक बॅग सापडली. घटनेची माहिती मिळताच देहली पोलीस, विशेष दल, आतंकवादविरोधी पथक आणि बाँबनाशक पथक यांच्यासह अन्य सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी पोचल्या. स्फोटकांना निकामी करण्याचे काम युद्धपातळीवर करून त्यांना निकामी करण्यात आले. गाझीपूर येथील बाजारात स्फोटके कशी आली, ती कुणी आणली, याचा शोध लावण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.

देहली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १४ जानेवारीच्या सकाळी पोलिसांना एक दूरभाष आला. त्यावर या स्फोटकांविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा स्फोटकांच्या शोधात लागले होते.