मदर तेरेसा यांच्या संस्थेच्या परदेशी देणगी नियमन कायद्यानुसारच्या नोंदणीचे केंद्र सरकारकडून नूतनीकरण

ही नोंदणी रहित झाल्यामुळे ओडिशा सरकारने मदर तेरेसा यांच्या संस्थेला मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून ७८ लाख रुपये दिले होते. आता हे पैसे सरकार परत घेणार का ? – संपादक

नवी देहली – मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ या संस्थेची परदेशी देणगी नियमन कायद्यानुसारची (‘एफ्.सी.आर्.ए.’ची) नोंदणी केंद्र सरकारने पुन्हा नियमित केली. परदेशी देणगी स्वीकारण्याविषयीचे संस्थेचे प्रमाणपत्र आता वर्ष २०२६ च्या अखेरपर्यंत वैध असणार आहे. या संस्थेची परदेशी देणगी नोंदणीचे नूतनीकरण करण्यास याआधी केंद्रीय गृहमंत्रालयाने नकार दिला होता.