ज्ञानयोग आणि ध्यानयोग या योगमार्गांत समष्टी साधनेला महत्त्व नसणे, तर गुरुकृपायोगात समष्टी साधना सर्वांत महत्त्वपूर्ण असणे !

गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या जिवांच्या व्यष्टी साधनेचा भाग समष्टी साधनेतच अंतर्भूत असल्यामुळे गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या जिवाला वेगळे काहीच करावे लागत नाही. याच कारणास्तव गुरुकृपायोगाने जाणार्‍या जिवांची अन्य योगमार्गाने जाणार्‍या जिवांच्या तुलनेत लवकर प्रगती साध्य होते.

हिंदु राष्ट्र प्रभावीपणे सांभाळण्यासाठी पालकांनी दैवी बालकांना सक्षम करणे आवश्यक !

ईश्वरी कृपेने पृथ्वीवर अनेक दैवी बालके जन्माला आली आहेत. त्यांना आपण बालवयातच अयोग्य सवयी शिकवल्या, तर ती बालके ‘धर्माचरण आणि साधना’ यांपासून आपोआप दुरावतील. ‘बालके अनुकरणप्रिय असल्याने पालकांनी अंतर्मुख होऊन प्रत्येक कृती करणे’, ही काळाची आवश्यकता आहे.

ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार काही वर्षांतच ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. अनेकांच्या मनात ‘हे राष्ट्र चालवणार कोण ?’, असा प्रश्न येतो. त्यासाठी ईश्वराने उच्च लोकांतून दैवी बालकांना पृथ्वीवर जन्म देऊन पाठवले आहे.