गोव्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम

पणजी – गोवा विधानसभेचा कार्यकाळ १५ मार्च २०२२ या दिवशी संपत आहे.

राज्यात एकूण ११ लक्ष ५६ सहस्र ४६४ मतदार

राज्यात एकूण ११ लक्ष ५६ सहस्र ४६४ मतदार आहेत. यामध्ये २ सहस्र २९४  नवीन मतदार आहेत. सर्व ४० मतदारसंघांमध्ये मतदारांची सर्वसाधारण संख्या सुमारे २८ सहस्र आहे. भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप हे राजकीय पक्ष शक्यतो सर्व मतदारसंघांतून उमेदवार उभे करणार आहेत, तर ‘गोवा फॉरवर्ड’ आणि ‘मगोप’ काही मोजक्या मतदारसंघांतून उमेदवार उभे करणार आहेत.

गोव्यातील निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

१. २१ ते २८ जानेवारी – उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत
२. २९ जानेवारी – उमेदवारी अर्जांची पडताळणी
३. ३१ जानेवारी – उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत
४. १४ फेब्रुवारी – मतदान
५. १० मार्च – मतमोजणी

निवडणूक आयोग ९ जानेवारीपासून सर्व फलक आणि होर्डिंग काढणार

गोव्यातील मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल

राज्यात निवडणुकीसाठी १ सहस्र ७२२ मतदान केंद्रे असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी ६४० मतदार असणार आहेत. नागरिक मतदान सूचीमध्ये १८ जानेवारीपर्यंत त्यांचे नाव समाविष्ट करू शकणार आहेत. निवडणूक आयोग ९ जानेवारीपासून सर्व फलक आणि होर्डिंग काढणार आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेले किंवा घरी अलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर ‘पोस्टल बॅलट’द्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. मतदान केंद्रावर एखाद्याला सातत्याने ताप येत असल्याचे आढळल्यास त्याला मतदान करता यावे यासाठी ‘पीपीई किट’ पुरवले जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निर्बंधांचे गोव्यात काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे. राजकीय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचे गुन्हेगारी उमेदवारांच्या संदर्भातील निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी केले.