ठार झालेल्या जिहादी आतंकवाद्याचे समर्थन करणार्‍या काश्मीरमधील पत्रकाराला अटक

आतंकवाद्यांचे समर्थन करणार्‍यांना आतंकवादी ठरवून त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे ! – संपादक

सज्जाद अहमदा डार

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) –लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी सलीम पैरी याला एका चकमकीत ठार करण्यात आल्यानंतर सलीम याच्या समर्थनार्थ एक व्हिडिओ प्रसारित केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी सज्जाद अहमदा डार या पत्रकाराला बांदीपोरा जिल्ह्यातून अटक केली. डार हा ‘द कश्मीरवाला’ या वृत्तसंकेतस्थळासाठी काम करत होता.

डार याने जो व्हिडिओ बनवला होता त्यात ठार झालेल्या आतंकवाद्याचे नातेवाईक भारतविरोधी घोषणा देत असतांना दिसत आहेत. यामध्ये पाकिस्तानाचे, तसेच आतंकवादी झाकीर मुसा याचे समर्थन करण्यात येत असल्याचे दाखवले आहे.