इयत्ता दुसरीतील हिंदु विद्यार्थिनीने गणिताचा प्रश्‍न न सोडवल्याने शिक्षा म्हणून तिला अल्लाची प्रार्थना करण्यास सांगितले !

बेंगळुरू येथील ‘ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल’मधील संतापजनक प्रकार

या घटनेविषयीचा व्हिडिओ बनवून प्रसारित केल्यावर शाळेकडून विद्यार्थिनीच्या पालकांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट

  • याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असल्याने याप्रकरणी हिंदु विद्यार्थिनीला न्याय मिळावा आणि शाळेवर कारवाई व्हावी, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक
  • एरव्ही हिंदु धर्माशी संबंधित काही शिकवले गेल्यास ‘शिक्षणाचे भगवेकरण केले जात आहे’, असा आरोप करणारे आता गप्प का ? – संपादक
डावीकडे दुसर्‍या इयत्तेत शिकणारी विद्यार्थिनी आणि तिचे वडील विक्रम सिन्हा

बेंगळुरू (कर्नाटक) – येथील ‘ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल’ या शाळेने दुसर्‍या इयत्तेत शिकणार्‍या एका विद्यार्थिनीचे वडील विक्रम सिन्हा यांच्यावर शाळेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. या विद्यार्थिनीला गणिताचा एक प्रश्‍न न सोडवल्याने शिक्षा म्हणून तिला अल्लाची प्रार्थना करण्यास बाध्य करण्यात आले होते, तसेच ‘याविषयी कुणालाच सांगू नये’, अशी धमकीही देण्यात आली होती. याविषयीचा एक व्हिडिओ बनवून तो प्रसारित केला होता. त्यानंतर या शाळेने अपकीर्ती करण्यात आल्याची तक्रार केली.