भोपाळ (मध्यप्रदेश) येथे ४ वर्षांच्या मुलीवर भटक्या कुत्र्यांनी आक्रमण करून केले घायाळ

भटक्या कुत्र्यांना पकडून एकाच ठिकाणी बंदीस्त का केले जात नाही ? येथे लोकांना जगण्याचा अधिकार आहे कि भटक्या कुत्र्यांना ? लोकांच्या मानवाधिकारपेक्षा काही प्राणीमित्र संघटनांना लोकांना त्रास देणार्‍या प्राण्यांचा अधिकार अधिक महत्त्वाचा वाटतो, हे लज्जास्पद !

(म्हणे) ‘हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या भडकाऊ विधानांचा निषेध करावा !’

या मान्यवरांनी कधी ‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला केल्यास १०० कोटी हिंदूंना पाहून घेऊ’ अशी धमकी दिल्यावर राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना पत्र लिहिले होते का ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी १६ जानेवारी २०२२ पर्यंत विविध निर्बंध

जिल्ह्यात झालेल्या निवडणुका आणि मतमोजणी तसेच एस्.टी.च्या कर्मचार्‍यांचा चालू असलेला संप या पार्श्‍वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत.

थकबाकी असलेल्यांच्या हाती सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सूत्रे गेल्याचे दु:ख ! – सतीश सावंत, शिवसेना नेते

पराभवावर बोलतांना सावंत म्हणाले, ‘‘या निवडणुकीत धनशक्ती आणि बळ यांचा वापर केला गेला. संतोष परब यांच्यावर आक्रमण करून ‘आमच्यासोबत राहिला नाहीत, तर तुमचाही संतोष परब होईल’, अशी भीती मतदारांमध्ये निर्माण केली गेली.

मालवण येथे मासेमारी कायद्यातील जाचक अटींच्या विरोधात पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करणार्‍या मासेमारांचे साखळी उपोषण चालू

सिंधुदुर्ग जिल्हा आधुनिक यांत्रिक रापणकार (पर्ससीन) असोशिएशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे.

ओरोस येथे पेट्रोलपंप लुटून पसार झालेल्या घाटकोपर (मुंबई) येथील ५ जणांना पकडण्यात पोलिसांना यश

सिद्धी पेट्रोलपंपावर चोरी करून पळणार्‍या ५ जणांना करूळ तपासणी नाक्यावर पोलिसांनी कह्यात घेतले. त्यांच्याकडे ५७ सहस्र रुपये रोख रक्कम आणि ३० भ्रमणभाष संच पोलिसांना सापडले.

ख्रिस्‍ती नववर्ष स्‍वागताच्‍या नावाखाली मुंबईत तरुणांचा धिंगाणा !

नववर्षाच्‍या स्‍वागतासाठी ठिकठिकाणी मध्‍यरात्री फटाके फोडण्‍यात आले. जुहू आणि खार येथे पबमध्‍ये रात्रभर पार्ट्या चालू होत्‍या. यांमध्‍ये सामाजिक अंतर, मास्‍कचा वापर आदी कोरोनाच्‍या नियमांची पायमल्ली करण्‍यात आली.

ख्रिस्ती नववर्षानिमित्त आलेल्या पर्यटकांकडून समुद्रकिनार्‍यांवर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रास उल्लंघन

रात्री चालू झालेली संगीत रजनी नियमबाह्यरित्या सकाळी १० वाजेपर्यंत चालू ठेवण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणार ध्वनीप्रदूषण होत होते. या घटनेवरून कळंगुटवासीय म्हणाले, ‘‘सरकारचे कोरोना प्रतिबंधात्मक नियम केवळ कागदोपत्रीच राहिले.’’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘शाळेपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत कोणत्याही शिक्षणात माणुसकी न शिकवल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात जनतेला लुबाडणारे व्यावसायिक आणि नोकरी करणारे निर्माण झाले आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’चा नोव्हेंबर २०२१ मधील प्रसारकार्याचा संख्यात्मक आढावा

गभरातील एकूण १९५ देशांपैकी (टीप) १९० देशांत एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ पहाणारे जिज्ञासू आहेत.