व्यसनाधिनता टाळण्यासाठी ‘दारू नको दूध प्या’ ! – राजू यादव, शिवसेना करवीरतालुकाप्रमुख

युवक-समाज यांना ३१ डिसेंबरच्या निमित्ताने ‘दारू नको दूध प्या !’, असे आवाहन करत शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या पुढाकाराने ३१ डिसेंबरच्या रात्री उंचगाव कमान येथे ‘दारू नको दूध प्या !’ हा उपक्रम राबवण्यात आला.   

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !

डॉ. सावंत यांनी नंतर श्री जोतिबा देव आणि नृसिंहवाडी येथे श्री दत्तगुरूंचे दर्शनही घेतले.

३१ डिसेंबरला वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई !

३१ डिसेंबरला वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या १ सहस्र ३७५ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात अचानक कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने अनेक निर्बंध लागू करण्यात आले.

पुणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखेतील महिला पोलीस निरीक्षकांची आत्महत्या !

शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी महिला पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या केली. ३१ डिसेंबर या दिवशी सकाळी त्यांनी त्यांच्या रहात्या घरी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

राज्‍यात निर्बंधांची तीव्रता वाढेल; मात्र दळणवळण बंदी लागू होणार नाही ! – राजेश टोपे, आरोग्‍यमंत्री

राज्‍यात ओमायक्रॉनच्‍या रुग्‍णांची संख्‍या झपाट्याने वाढत आहे. मुंबई शहरातील काही भागांमध्‍ये कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची संख्‍या ११ टक्‍के झाली आहे. त्‍यामुळे राज्‍यभरात निर्बंधाची कठोर कार्यवाही केली जाईल.

नसीरुद्दीन शाह भयग्रस्त का ?

यापुढे, …… अशा धर्मनिरपेक्षतेमुळेच आपला घात झाला आहे’, हे हिंदूंनी ओळखले आहे. हिंदूंच्या सहिष्णुतेचा अपलाभ घेऊन आज शाह हिंदूंनाच धमकी देत आहेत. आज धमकी देणारे धर्मांध हिंदूंच्या विरोधात कृतीही करतील. त्यामुळे हिंदूंनी सर्वधर्मसमभावाच्या पेचात न अडकता हिंदूंचे हित साधणारे हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हेच हिताचे ठरते !

सातारा येथे मद्यप्राशन करून वाहन चालवणार्‍या १२ जणांवर गुन्हे नोंद !

३१ डिसेंबर या दिवशी नववर्ष स्वागतासाठी मद्यप्राशन करून वाहने चालवली जातात. याचा पूर्वानुभव लक्षात घेता शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने पोलीस पथके निर्माण केली गेली.

सोलापूर येथे ३५ गोवंशियांना पोलिसांकडून जीवदान !

येथील शास्त्रीनगर भागातील तायम्मा मंदिराजवळ इब्राहिम कुरेशी याच्या घराला लागून असलेल्या पडक्या वाड्यात कत्तलीसाठी आणलेल्या ३५ गोवंशियांना पोलिसांनी जीवदान दिले.

यावल (जळगाव) येथील भुईकोट किल्ल्यावर शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी यांचे ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य नष्ट न होण्यासाठी प्रबोधन !

ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य अबाधित रहावे, यासाठी शासन-प्रशासन यांनी योग्य ती नियमावली करून अशी कृती करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावल शहरातील शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी युवकांनी केली.

मुंबईत हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र प्रसार अभियानास उत्तम प्रतिसाद !

हिंदूंवरील होणार्‍या आघातांविषयी समाजामध्ये जागृती करण्याचा मालाड येथे झालेल्या उद्योगपतींच्या बैठकीत धर्मप्रेमींचा निर्धार !