१. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्यांची संख्या (नोव्हेंबर २०२१ या मासातील)
२. ‘ऑनलाईन’ प्रसार
अ. नोव्हेंबर २०२१ मध्ये १५ सहस्र ४५३ लोकांनी ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’, ‘यू ट्यूब’ आणि ‘पिंटरेस्ट’ या सर्व वाहिन्यांच्या माध्यमातून एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट दिली.
आ. एस्.एस्.आर्.एफ्.च्या ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’, ‘पिंटरेस्ट’ या सर्व वाहिन्यांची नोव्हेंबर २०२१ पर्यंतची एकूण सदस्यसंख्या ३ लाख २४ सहस्र ३५७ आहे.
३. संकेतस्थळावरील लेख जगातील ७ भाषांमध्ये !
नोव्हेंबर २०२१ मध्ये ‘एस्.एस्.आर्.एफ्’च्या संकेतस्थळावर नेपाळी, चिनी, इंडोनेशियन, इटालियन, रशियन, सर्बियन आणि क्रोएशियन, या ७ भाषांमधील एकूण २५ लेख ठेवण्यात आले.
४. ‘लाईव्ह चॅट’ (संकेतस्थळाला भेट देणार्या जिज्ञासूंशी संवाद साधण्याचे तंत्रज्ञान)
याद्वारे हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश, सर्बाे-क्रोएशियन, फ्रेंच, इंडोनेशियन आणि रशियन, या ७ भाषांतील ९९० वाचकांशी संवाद साधता आला.
५. विविध देशांत घेण्यात आलेली ‘ऑनलाईन’ व्याख्याने आणि कार्यशाळा यांच्या माध्यमातून झालेला व्यापक प्रसार अन् त्यांना जिज्ञासूंचा मिळालेला प्रतिसाद !
अ. नोव्हेंबर २०२१ मध्ये अमेरिका आणि कॅनडा येथे इंग्रजी भाषेत; क्रोएशिया, सर्बिया, रशिया आणि मॅसेडोनिया येथे सर्बियन अन् क्रोएशियन या भाषांत; इंडोनेशिया येथे इंडोनेशियन भाषेत; युनायटेड किंगडम, फ्रान्स, रोमानिया, हंगेरी, हॉलंड, बेल्जियम, इस्रायल, इस्टोनिया आणि इटली येथे इंग्रजी अन् फ्रेंच या भाषांत; तर बोलिव्हिया, व्हेनेझुएला आणि मेक्सिको येथे स्पॅनिश भाषेत, अशी एकूण ‘ऑनलाईन’ ११ व्याख्याने अन् ३ कार्यशाळा घेण्यात आल्या. १ सहस्र ११३ जिज्ञासूंनी या प्रवचनांचा, तर १४ जिज्ञासूंनी कार्यशाळांचा लाभ घेतला.
आ. नोव्हेंबर २०२१ मध्ये सद्गुरु सिरियाक वाले यांनी २५ ‘ऑनलाईन नामजप सत्रे’ घेतली. यांचा एकूण ४ सहस्र ७५६ साधक आणि जिज्ञासू यांनी लाभ घेतला.
६ . विविध विभागांत घेण्यात घेण्यात आलेल्या सत्संगांची संख्या
७. जगभरातील एकूण १९५ देशांपैकी (टीप) १९० देशांत एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ पहाणारे जिज्ञासू आहेत.
(टीप – जगभरातील एकूण देशांची संख्या : सध्या जगभरात एकूण १९५ देश आहेत. त्यांतील १९३ देश ‘संयुक्त राष्ट्रा’चे सदस्य आहेत. २ देश (‘होली सी’ आणि ‘स्टेट ऑफ पॅलेस्टाइन’) संयुक्त राष्ट्रात केवळ पर्यवेक्षक आहेत, म्हणजे ‘संयुक्त राष्ट्रा’च्या बैठकांना पर्यवेक्षक म्हणून बसू शकतात. या व्यतिरिक्त ‘संयुक्त राष्ट्रा’च्या ११ व्या सनदी अध्यायात १७ स्वयंशासित नसलेले प्रदेश आहेत. तेथील लोकांनी अजून स्वतःचे शासन प्रमाणित केलेले नाही. ‘संयुक्त राष्ट्रा’च्या काही सदस्य देशांकडे अशा प्रदेशांचे प्रशासकीय अधिकार आहेत.)
श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता !’
– (सद्गुरु) सिरियाक वाले, युरोप (डिसेंबर २०२१)
‘एस्.एस्.आर्.एफ्. लाईव्ह चॅट’संबंधीचा अभिप्रायमी साधनेवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्वाेत्तम प्रयत्न करीन ! : ‘तुम्ही मला साधनेसंदर्भात मार्गदर्शन करा. मी तुम्हाला निराश करणार नाही. मी साधनेवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्वाेत्तम प्रयत्न करीन. तुमचे मनापासून कौतुक; कारण मी कधीही कोणालाही सर्व प्रश्नांची उत्तरे इतक्या संयमाने देतांना पाहिले नाही. तुमचे मनापासून आभार !’ – श्री. दिनेश, भारत (नोव्हेंबर २०२१) |