भोपाळ (मध्यप्रदेश) येथे ४ वर्षांच्या मुलीवर भटक्या कुत्र्यांनी आक्रमण करून केले घायाळ

मध्यप्रदेश मानवाधिकार आयोगाची प्रशासन आणि नगरपालिका यांना नोटीस

  • स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षांनीही भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना काढू न शकणे, हे भारताला लज्जास्पद ! – संपादक
  • भटक्या कुत्र्यांना पकडून एकाच ठिकाणी बंदीस्त का केले जात नाही ? येथे लोकांना जगण्याचा अधिकार आहे कि भटक्या कुत्र्यांना ? लोकांच्या मानवाधिकारपेक्षा काही प्राणीमित्र संघटनांना लोकांना त्रास देणार्‍या प्राण्यांचा अधिकार अधिक महत्त्वाचा वाटतो, हे लज्जास्पद ! – संपादक

भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील अंजली विहार फेस-२ मध्ये एका ४ वर्षांच्या मुलीवर ५ भटक्या कुत्र्यांनी आक्रमण केल्याने ती गंभीररित्या घायाळ झाली. याविषयी मध्यप्रदेश मानवाधिकार आयोगाने नगरपालिका, प्रशासन आणि आरोग्य विभाग यांना नोटीस बजावली आहे. यावर ७ दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. नोटिसीमध्ये, ‘वर्ष २०२१ मध्ये किती कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे ?’, ‘रेबिज (ज्या रोगामुळे कुत्रे पिसाळतात, तो रोग) झालेल्या किती कुत्र्यांना शहराबाहेर घालवण्यात आले आहे ?’, आदी माहिती मागवण्यात आली आहे.