‘इस्कॉन’ २३ ऑक्टोबरला १५० देशांत निदर्शने करणार !

‘इस्कॉन’ जे करत आहे, त्यांच्या बरोबरीने देशातील अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना, धार्मिक संघटना, साधू, संत आदींनी या आक्रमणांच्या विरोधात एकजुटीने आवाज उठवायला हवा, असे हिंदूंना अपेक्षित आहे !

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा’ त्वरित लागू करावा !

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर भारतात ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा’ (एन्.आर्.सी.) त्वरित लागू करून अवैधरित्या देशात रहाणार्‍या बांगलादेशी मुसलमानांना हुसकावून लावण्यात यावे, अशी मागणी अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी निवेदनाद्वारे केली आहे

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांच्या पेरमिली दलम्चा सदस्य मंगरू मडावी याला अटक !

जिल्ह्यातील अहेरी पोलीस उपविभागाच्या अंतर्गत येणार्‍या पेरमिली क्षेत्रात गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गडचिरोलीचे विशेष अभियान राबवण्यात आले. पथकाच्या सैनिकांनी पेरमिली अरुण्य परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवले. त्या वेळी रात्री पहारा देत असतांना नक्षलवाद्यांचा पेरमिली दलम्चा सदस्य मंगरू मडावी याला….

पंजाब येथील काँग्रेसच्या आमदाराकडून ‘तुम्ही गावासाठी काय केले ?’ असा प्रश्न विचारणार्‍या तरुणाला बेदम मारहाण !

आम्ही काहीही काम करणार नाही, त्याविषयी कुणी आम्हाला विचारायचेही नाही आणि विचारलेच, तर आम्ही त्याला बदडू’, या वृत्तीचे काँग्रेसचे आमदार !

उत्तराखंडमध्ये पूरस्थितीमुळे ४६ जणांचा मृत्यू, तर अनेक जण बेपत्ता 

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे मोठी हानी झाली आहे. राज्यात आतापर्यंत ४६ लोकांचा मृत्यू झाला आहे. नैनितालसह अनेक भागांत लोक बेपत्ता असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. नैनिताल जिल्ह्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे.

शोपिया येथे २ आतंकवादी ठार, तर १ सैनिक हुतात्मा

युक्त पथक आतंकवादी लपलेल्या ठिकाणी जात असतांना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांनी प्रत्युत्तर दिल्यावर चकमक चालू झाली.

गोव्यात वर्ष २०१६ पासून महिलांवर बलात्कार केल्याची एकूण ३८७ प्रकरणे नोंद

केवळ २.३ टक्के घटनांतील आरोपींना शिक्षा होणे हे अन्वेषणाचे अपयश समजायचे कि कायदे कमकुवत आहेत ?

चीनने सीमेवर तैनात केले १०० रॉकेट लाँचर !

सीमावादावर तोडगा काढण्यासाठी चीनसमवेत सैन्यस्तरावर चर्चा चालू असतांनाच चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हालचाली वाढवल्या आहेत. चीनने सीमेवर १०० हून अधिक अत्याधुनिक रॉकेट लाँचर तैनात केले आहेत. तसेच हॉवित्जर तोफाही तैनात केल्या आहेत.

बांगलादेश येथील दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई करा ! – बजरंग दलाचे मिरज येथे निवेदन

बांगलादेशातील अल्पसंख्यांक शीख आणि हिंदू यांवर आक्रमण करणार्‍या दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई होण्यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशा मागणीचे निवेदन बजरंग दलाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयात देण्यात आले.

बांगलादेशात हिंदूंवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा ! – नाशिक येथील हिंदुत्वनिष्ठांची मागणी

बांगलादेशात नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडप आणि ‘इस्कॉन’ मंदिर यांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे येथील हिंदुत्वनिष्ठांनी निवेदनाद्वारे केली आहे.