जातीय, आर्थिक, राजकीय आणि वैद्यकीय आतंकवादांपासून जगाला मोठा धोका ! – योगऋषी रामदेवबाबा

पाण्याचा एक धर्म, आगीचा एक धर्म आणि वार्‍याचा एक धर्म असतो. त्यामुळे सर्व मानवजातीचा धर्म एकच आहे’, असे मार्गदर्शन योगऋषी रामदेव बाबा यांनी येथे केले.

मुख्य साक्षीदार किरण गोसावी यांनी अभिनेते शाहरूख खान यांच्याकडे २५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप !

अमली पदार्थ विरोधी पथकाने २ ऑक्टोबरच्या रात्री ‘कॉर्डेलिया क्रूझ’वर केलेल्या कारवाईत आर्यन खान याच्यासह अन्यांना अटक करण्यात आल्यानंतर मुख्य साक्षीदार असलेले किरण गोसावी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

अफगाणिस्तानमधील परिस्थितीचे काश्मीरमध्ये परिणाम जाणवतील ! –  सी.डी.एस्. जनरल बिपिन रावत

अफगाणिस्तानमधील परिस्थितीचे जम्मू आणि काश्मीरमध्ये परिणाम जाणवतील. त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्याला सिद्ध राहिले पाहिजे. त्यासाठी आपल्या सीमा बंद करणे, देखरेख करणे आणि टेहाळणी करणे, या महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

बांगलादेशातील हिंदुविरोधी हिंसाचाराच्या प्रकरणी आणखी एका सूत्रधाराला अटक

रंगपूरच्या पीरगंज उपजिल्ह्यात १७ ऑक्टोबरला झालेल्या हिंसाचाराचा सूत्रधार असलेला शैकत मंडल आणि त्याचा साथीदार या दोघांना ढाक्याच्या सीमेवरील गाझीपूर येथून अटक करण्यात आली.

तुर्कस्तानकडून अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आदी १० देशांच्या राजदूतांवर देश सोडून जाण्याचा आदेश

तुर्कस्तानच्या अंतर्गत प्रश्‍नात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणार्‍या बलाढ्य देशांच्या राजदूतांची हकालपट्टी करण्याचा आदेश देणार्‍या तुर्कस्तानकडून भारत काही शिकेल का ?

डाबर आस्थापनाच्या विज्ञापनातून करवा चौथ व्रताचा अश्‍लाघ्य अवमान

हिंदूंच्या धार्मिक व्रतांचे अशा प्रकारे अवमान करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा कायदा नसल्याने सर्वांचेच फावते आहे. याकडे केंद्र सरकार कधी लक्ष देणार, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होत आहे !

‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेने प्रकाशित केले खलिस्तानी राष्ट्राचे मानचित्र !

अमेरिकेतील ‘सिख फॉर जस्टिस’ नावाच्या बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानवादी संघटनेने खलिस्तानी राष्ट्राचे मानचित्र (नकाशा) प्रकाशित केले आहे.

उत्तरप्रदेशातील ‘फैजाबाद रेल्वे जंक्शन’चे नाव ‘अयोध्या कँट’ होणार

ज्या प्रमाणात उत्तरप्रदेश सरकार राज्यातील मोगलकालीन नावे पालटत आहे, त्या प्रमाणात अन्य कुठल्याही राज्यात असे होतांना दिसत नाही. केंद्र सरकारने आता  देशभरातील मोगल आणि ब्रिटीश कालीन नावे पालटण्याचा निर्णय घेतला पाहिजे !

बांगलादेशमध्ये हिंदूंना दिली जाते खालच्या दर्जाचे नागरिक म्हणून वागणूक ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

बांगलादेशात हिंदुविरोधी भावना नवीन नाही. श्री दुर्गादेवीच्या पूजेच्या वेळी हिंदूंना कोणतेही संरक्षण दिले गेले नाही, हे विचित्र आहे. पंतप्रधान शेख हसीना हे चांगल्या प्रकारे जाणतात की, प्रतिवर्षी दुर्गापूजेच्या वेळी हिंदूंवर ‘जिहादी’ आक्रमणाची शक्यता असते

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘वर्ष १९६२ च्या युद्धात भारताची भूमी चीनने बळकावली, हा राष्ट्रीय अपमान आहे. हे विसरणार्‍यांना देशात रहाण्याचा अधिकार आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले