धाराशिव येथे धर्मांधांकडून दगडफेक !

सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झालेल्या औरंगजेबाविषयीच्या ‘फेसबूक पोस्ट’वरून धार्मिक भावना दुखावल्याचे कारण पुढे करत धर्मांधांनी शहरातील विजय चौक येथे १९ ऑक्टोबरच्या रात्री दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये विजय चौक येथे बंदोबस्तासाठी असलेले ४ पोलीस घायाळ झाले…

‘मिथिनेल’च्या निर्मितीसाठी केंद्रशासन साखर कारखान्यांना निधीची तरतूद करणार ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

राज्यातील साखर कारखान्यांच्या विविध समस्यांविषयी देवेंद्र फडणवीस यांसह भाजपचे नेते रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनी १९ ऑक्टोबर या दिवशी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

‘सीबीआय’चे संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्याविषयी न्यायालयीन प्रकरणात राज्य सरकारकडून १४ वर्षांनंतर प्रतिज्ञापत्र सादर !

केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआयचे) संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांच्या पूर्वीच्या एका न्यायालयीन प्रकरणात राज्य सरकारने १४ वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात २ डोस घेतलेले आणि ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी केलेले यांनाच प्रवेश !

अधिवेशनात सहभागी विधीमंडळ सदस्य, सर्व अधिकारी-कर्मचारी, वृत्तसंकलनासाठी येणारे माध्यमांचे प्रतिनिधी, सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलीस, राज्यभरातून येणारे वाहन चालक या सर्वांनी २ डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणि ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ची चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

बांगलादेशाप्रमाणे मुंबईतही हिंदु असुरक्षित ! – आमदार नीतेश राणे, भाजप

मालवणी भागातील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा ठिकाणी जाऊन आम्ही हिंदूंमध्ये धारिष्ट्य निर्माण करणार आहोत. बांगलादेशाप्रमाणे मुंबईतही हिंदू असुरक्षित आहे. मुंबईतील हिंदूंच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरणार आहोत, असे वक्तव्य भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केले.

आर्यन खान याच्यासह तिघांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला !

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्यासह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला आहे. ‘कॉर्डेलिया क्रूझ’वर धाड टाकल्यानंतर केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने या सर्वांना अटक केली होती.

सांगोला साखर कारखान्याची निवडणूक लढवण्यासाठी ५७ लाख रुपये वाटले !

केवळ साखर कारखान्याची निवडणूक लढवण्यासाठी लाखो रुपये वाटावे लागत असतील, तर नगरसेवक, आमदार, खासदार या पदांच्या निवडणुकांसाठी किती रुपयांचे वाटप होत असेल, याची कल्पना येते. पैसे वाटून निवडून येणारे उमेदवार कधी विधायक कार्य करू शकतील का ?

वाचनालये ग्रंथसंपदेने समृद्ध व्हावीत ! – संजीव रेड्डी बोदकुरवार, आमदार, भाजप

येथील सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियानां’ तर्गत आमदार संजीवभाऊ बोदकुरवार यांची सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने भेट घेण्यात आली.

देवगड येथे अवैधरित्या मासेमारी करणार्‍या कर्नाटक राज्यातील २ नौकांवर कारवाई

मत्स्यव्यवसाय विभागाने महाराष्ट्र राज्याच्या  सागरी जलधी क्षेत्राच्या नियमांचा भंग करून अवैधपणे मासेमारी करणार्‍या मलपी, कर्नाटक येथील २ नौकांना पकडले.

राज्यातील रेस्टॉरंट रात्री १२, तर दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास शासनाची अनुमती !

राज्यातील रेस्टॉरंट रात्री १२ वाजेपर्यंत, तर अन्य दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास राज्यशासनाने अनुमती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे.