श्री क्षेत्र ओझर येथे ‘श्रीं’च्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त तृतीय पश्चिम द्वार सोहळा !

दर्शनासाठी जमलेले भाविक

श्री क्षेत्र ओझर (जिल्हा पुणे) – श्री क्षेत्र ओझर येथे ६ सप्टेंबर या दिवशी ‘श्रीं’च्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने तृतीय पश्चिम द्वार सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला. या प्रसंगी ‘श्री विघ्नहर गणपति देवस्थान ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण कवडे, विश्वस्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यात शिरोली खुर्द रति-कंदर्प पूजा करण्यात आली. या सोहळ्यात श्रीराम प्रसादिक भजनी मंडळ आणि श्री विठ्ठल प्रसादिक भजन मंडळ सहभागी झाले होते. या प्रसंगी १० सहस्रांहून अधिक भाविक उपस्थित होते.

श्री क्षेत्र ओझर येथे निघालेली पालखी मिरवणूक