पूर्वीपासून धुपेमळ भागाला ‘धर्मवीर छत्रपती संभाजी नगर’ हेच नाव होते !  दिलखुश शेट, हिंदवी स्वराज्य संघटना

‘धर्मवीर छत्रपती संभाजी नगर’ या नावाचा फलक हटवण्यासाठी श्रीस्थळ पंचायतीने पाठवलेल्या नोटिसीला हिंदवी स्वराज्य संघटनेने दिले उत्तर !

अवैध खाण व्यवसायांवर कारवाई न केल्यास प्रांताधिकारी कार्यालयावर मार्चा काढणार ! – परशुराम उपरकर, माजी आमदार, मनसे

अधिकारी आणि खाण व्यावसायिक यांच्या संगनमतामुळे १२ कोटी रुपये दंडाची वसुली झाली नसल्याचा आरोप

(म्हणे) ‘मी जन्माने हिंदु आहे आणि मला भाजपने हिंदुत्वाचे प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही !’  ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची विविध मंदिरे आणि तपोभूमी यांना भेट

गुरुग्राम (हरियाणा) येथे सार्वजनिक ठिकाणी नमाजाला विरोध करणारे ३० हिंदू पोलिसांच्या कह्यात !

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारचा हिंदूंना विरोध का करावा लागत आहे ?

पाक क्रिकेट संघाच्या विजय साजरा करतांनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित करणारी जम्मू येथील वैद्यकीय महिला कर्मचारी नोकरीतून बडफर्त

भारतात राहून पाकचा विजय साजरा करणार्‍यांना सरकार पाकमध्येच का हाकलून देत नाही ?

(म्हणे) त्रिपुरामध्ये आमच्या मुसलमान बांधवांसमवेत अमानुषता होत आहे ! – राहुल गांधी यांना कळवळा

गेल्या काही दिवसांत बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अमानुष आक्रमणाच्या वेळी ‘मी दत्तात्रय गोत्राचा असून जानवे परिधान करणारा हिंदू आहे’, असे सांगणार्‍या राहुल गांधी यांना कळवळा का आला नाही ?

भारत-पाक क्रिकेट सामन्यात पाकच्या विजयाच्या घोषणा देणार्‍या ३ काश्मिरी मुसलमान विद्यार्थ्यांना अधिवक्त्यांनी चोपले !

सरकारने आता सर्वच काश्मिरी मुसलमान विद्यार्थ्यांच्या देशप्रेमाची पडताळणी केली पाहिजे, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ?

सर्वच नाही, तर केवळ घातक फटाक्यांवर बंदी ! – सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

देशात फटाक्यांवर १०० टक्के बंदी नाही. ती केवळ हानीकारक रसायनांपासून निर्मित फटक्यांवरच आहे. ‘हरित’ फटाक्यांवर नाही. आमच्या आदेशाचे कठोरपणे पालन केले जावे, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने फटक्यांविषयीच्या याचिकेवर सुनावणी करतांना दिले.

(म्हणे) ‘बांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणांत मंदिरांची तोडफोड आणि बलात्काराच्या घटना झाल्याच नाहीत !’ – बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्री

बांगलादेश सरकार स्वतःची लाज राखण्यासाठी अशा प्रकारचा खोटा दावा करत आहे, हे सांगायला कोणत्याही तज्ञांची आवश्यकता नाही. जे जगाने पाहिले आहे, त्याला थेट नाकारणे हा खोटारडापणाच आहे.

‘फेसबूक’ आस्थापनाचे नाव आता ‘मेटा’ !

‘फेसबूक’ या सामाजिक माध्यमाच्या आस्थापनेने त्याचे नाव पालटून आता ‘मेटा’ असे ठेवले आहे; मात्र या आस्थापनेच्या सामाजिक माध्यमाचे ‘फेसबूक’ हे नाव कायम ठेवण्यात आले आहे.