‘आम्ही काहीही काम करणार नाही, त्याविषयी कुणी आम्हाला विचारायचेही नाही आणि विचारलेच, तर आम्ही त्याला बदडू’, या वृत्तीचे काँग्रेसचे आमदार ! अशा गुंड प्रवृत्तीच्या आणि निष्क्रीय आमदारांची आमदारकी रहित करून त्यांना घरचा रस्ता दाखवल्यासच ते वठणीवर येतील ! – संपादक

पठाणकोट (पंजाब) – पठाणकोट जिल्ह्यातील भाओ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार जोगिंदर पाल यांना ‘तुम्ही गावासाठी काय केले ?’, असा प्रश्न विचारणार्या तरुणाला मारहाण केली. पाल हे येथे एका छोट्या सभेत लोकांना संबोधित करत होते. त्या वेळी तेथे एक तरुण आला आणि पाल यांच्या भाषणाच्या मध्येच त्यांना वरील प्रश्न विचारला. यावर चिडलेल्या पाल यांनी तरुणास बेदम मारहाण केली. हे पाहून पाल यांच्या सुरक्षारक्षकांनीही सदर तरुणाला बेदम मारहाण केली. याविषयीचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित झाला आहे. हा व्हिडिओ नवरात्रीच्या कालावधीतील असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेविषयी राज्याचे गृहमंत्री सुखजिंदरसिंह रंधवा यांनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे. ‘आमदारांनी असे वागू नये. आपण लोकप्रतिनिधी असून जनतेची सेवा करण्यासाठी येथे आहोत’, असे त्यांनी सांगितले. (केवळ असे शाब्दिक उपदेश देण्यापेक्षा गृहमंत्र्यांनी पाल यांच्यावर कारवाई करायला हवी, अशी जनतेची मागणी आहे ! – संपादक)
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !