ग्रामस्थांच्या चेतावणीनंतर डांगमोडे, मालवण येथे वाळू काढण्यासाठी बांधलेले १२ रॅम्प महसूल विभागाच्या पथकाकडून उद्ध्वस्त !

वाळूचा अवैध उपसा होत असल्याचे ग्रामस्थांनी महसूल विभागाला का दाखवून द्यावे लागते ? तसेच ग्रामस्थांनी चेतावणी दिल्यानंतर कारवाई करणारे प्रशासन काय कामाचे ?

निवती-मेढा येथे सिलिंडरच्या स्फोटात घर आणि साहित्य यांची ८ लाख रुपयांची हानी

या स्फोटात मेथर यांची ८ लाख रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्फोट झाल्याचे लक्षात येताच घरातील व्यक्ती वेळीच बाहेर पडल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्या निषेधार्थ ‘इस्कॉन’कडून १५० देशांतील ७०० मंदिरांजवळ आंदोलने !

ट्विटरवरील #SaveBangladeshiHindus हा हॅशटॅग ट्रेंड जागतिक स्तरावर ५ व्या क्रमांकावर !

आर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाची अट असलेला वार्षिक ८ लाख रुपये उत्पन्नमर्यादेचा आकडा हवेतून आणला का ? – सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्‍न

या प्रश्‍नावर स्पष्टीकरण न देता आल्याने ‘समाधानकारक उत्तर न मिळाल्यास हे आरक्षण घोषित करणारा अध्यादेशच स्थगित करू’, अशी चेतावणी न्यायालयाने दिली.

कांकेर (छत्तीसगड) येथील सेंट जोसेफ शाळेत हिंदु विद्यार्थ्याला शेंडी कापण्यास सांगितल्याने हिंदूंचा विरोध

अशा शाळा प्रशासनाने ख्रिस्ती मिशनरींच्या नियंत्रणातून स्वतःच्या नियंत्रणात घेतल्या पाहिजेत. हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करण्यास पुढाकार घेणारे शासनकर्ते याविषयी मात्र गप्प असतात, हे लक्षात घ्या !

‘एफ्.ए.टी.एफ्.’ने पाकिस्तानसमवेत तुर्कस्तानलही घातले करड्या सूचीमध्ये !

या दोन्ही देशांना आता अन्य देशांकडून, तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून आर्थिक साहाय्य मिळणे कठीण होऊ शकते.

तालिबानला आतंकवादी संघटनेच्या सूचीतून बाहेर काढण्याविषयी विचार करू ! – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन

असे झाल्यास, हा भारतासाठी धोकादायक निर्णय ठरेल ! त्यामुळे भारताचा ‘मित्रराष्ट्र’ असलेल्या रशियाला भारत यापासून परावृत्त करेल का ?

(म्हणे) ‘मला हिंदु असल्याची लाज वाटते !’ – अभिनेत्री स्वरा भास्कर

बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांत हिंदूंवर ज्या पद्धतीने आक्रमणे झाली, त्याविषयी स्वरा भास्कर यांनी चकार शब्द काढलेला नाही. हे पहाता ‘स्वरा भास्कर हिंदु असल्याचीच आम्हाला लाज वाटते’, असे हिंदूंना म्हटल्यास चुकीचे ते काय ?

पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्वातंत्र्यासाठी स्थानिक पक्षाकडून मोर्च्याचे आयोजन

मोर्चा काढून पाकव्याप्त काश्मीरला स्वातंत्र्य मिळू शकणार नाही, त्यासाठी तेथील नागरिकांनी पाकविरुद्ध सशस्त्र उठाव केला पाहिजे ! भारताला नेजाती सुभाषचंद्र बोस आणि क्रांतीकारक यांच्यामुळेच स्वातंत्र्य मिळाले होते, हा इतिहास आहे !

कार्तिक अमावास्येला होणार्‍या ग्रहयोगामुळे भारतीय सैन्य सीमेवर मोठी कारवाई करण्याची शक्यता ! – ज्योतिषाचे भाकित

कार्तिक अमावास्या दिवशी मंगळ ग्रह तुळ राशीमध्ये ६ व्या स्थानी असलेले शनि आणि गुरु ग्रह यांच्यावर चौथी दृष्टी ठेवून असल्याने भारताच्या सीमेवर भारतीय सैन्य एखादी मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे, असे भाकित ज्योतिषी सचिन मल्होत्रा यांनी वर्तवले आहे.