मुंबई – परळ येथील सेनापती बापट मार्गावरील कमला मिल कंपाऊंडनजीकच्या टाइम्स टॉवरला ६ सप्टेंबर या दिवशी सकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक आग लागली. सुदैवाने आगीत कुणीही घायाळ झाले नाही. १४ मजली टाइम्स टॉवरच्या विद्युत् यंत्रणेत बिघाड झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज आहे. इमारतीच्या ३ र्या ते ७ व्या मजल्यांमध्ये ही आग पसरली. विद्युत् तारा आगीच्या संपर्कात आल्याने मोठा आगडोंब उसळला. दुपारी १२ वाजेपर्यंत आग पूर्ण नियंत्रणात आली. काचेची इमारत असल्याने धूर बाहेर पडण्यास जागा नसल्याने अग्नीशामक दलाच्या जवानांनी इमारतीच्या काही काचा फोडल्या. अग्नीशमनदलाचे जवान, पोलीस, बेस्ट उपक्रम आणि संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारी यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
परळ (मुंबई) येथील ‘टाइम्स टॉवर’ला आग
नूतन लेख
- दसर्याच्या पार्श्वभूमीवर म्हापसा येथे रस्त्याच्या बाजूला अनधिकृतपणे फुले विक्री करणार्यांवर कारवाई
- प्रा. सुभाष वेलिंगकर यांचे डिचोली पोलिसांकडून ३ घंटे अन्वेषण
- भूमी बळकावल्याच्या प्रकरणी म्हापसा येथे सुलेमान खान याच्या अनधिकृत बांधकामावर ‘बुलडोझर’ कारवाई !
- अहमदनगर जिल्ह्यातील ‘नेवाशा’चे नामांतर ‘ज्ञानेश्वरनगर’ करा ! – डॉ. करणसिंह घुले, समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष
- मदरशांतील शिक्षकांच्या मानधनवाढीपेक्षा मदरशांवरच बंदी का घालत नाही ? – अजयसिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेना
- महाराष्ट्राचे चित्रपट धोरण निश्चित करण्यासाठी समितीची स्थापना !