‘हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाऊंडेशन’च्या वतीने जुना राजवाडा कमानीस तांब्याचे तोरण

‘हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाऊंडेशन’ या इतिहासप्रेमी संस्थेच्या वतीने गेली ३२ वर्षे दसर्‍याच्या दिवशी जुना राजवाडा कमानीस तांब्याच्या कलशाचे मंगल तोरण बांधण्यात येते.

कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर १८ ते २० ऑक्टोबर या कालावधीत धाराशिवमध्ये जिल्हाबंदी !

कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नसल्याने धाराशिवचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि पोलीस अधीक्षक नीवा जैन यांनी १८ ते २० ऑक्टोबर या कालावधीत धाराशिव जिल्हाबंदी घोषित केली आहे.

पुणे येथे अडीच लाखांची लाच घेतांना शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासह तिघांना अटक !

शिक्षण संस्थेचे अध्यक्षच लाच घेत असतील, तर विद्यार्थ्यांवर नैतिकतेचे संस्कार कसे होणार ?

कोल्हापुरात शाही दसरा उत्साहात : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन

कोल्हापूर, १७ ऑक्टोबर – छत्रपतींची राजधानी असणार्‍या करवीरनगरीत पारंपरिक विजयादशमीचा सण ऐतिहासिक दसरा चौकात शाही थाटात आणि उत्साहात पार पडला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन झाले. यानंतर छत्रपतींच्या कुटुंबातील खासदार छत्रपती संभाजीराजे, छत्रपती मालोजीराजे, छत्रपती शहाजीराजे, छत्रपती यशराजराजे आणि छत्रपती यशस्विनीराजे यांनी सोने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करून सोने लुटले. तत्पूर्वी करवीरनिवासिनी … Read more

सर्वच तालुक्यांतील पोलीस ठाण्यांमध्ये ‘महिला तक्रार निवारण कक्ष’ स्थापन करण्याची मागणी !

महिला आणि मुली यांवरील अत्याचाराविषयी कायदे कडक करून त्यांची कार्यवाही करण्यासाठी सर्वच तालुक्यांतील पोलीस ठाण्यामध्ये ‘महिला तक्रार निवारण कक्ष’ स्थापन करावेत, असे निवेदन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना समक्ष भेटून दिले.

शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ श्री दुर्गादेवी पूजा मंडपामध्ये चपलांचे प्रदर्शन !

‘हिंदूंच्या धार्मिक उत्सवांचे ठिकाण हे सामाजिक विषयांसाठी नाही’, हे हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे ठाऊक नाही. त्यामुळेच ते अशा प्रकारचे हिंदुद्रोही कृत्य करतात, हे लक्षात घ्या !

केंद्र सरकारचे ‘आयुध निर्माण मंडळ’ विसर्जित करून ७ आस्थापनांची निर्मिती

सुमारे ७५ सहस्र कर्मचारी या मंडळात काम करत असून कुणालाही कामावरून न काढता यांना या आस्थापनांमध्ये केंद्रीय कर्मचारी म्हणून सामावून घेतले जाणार आहे. ही प्रक्रिया पुढील २ वर्षांत पूर्ण केली जाणार आहे.

मराठा आरक्षण मिळेपर्यंत गळ्यात हार घालणार नाही ! – पंकजा मुंडे यांची भगवानगडावर घोषणा

मराठा आरक्षण मिळेपर्यंत मी गळ्यात हार घालणार नाही, अशी घोषणा भाजपच्या नेत्या सौ. पंकजा मुंडे-पालवे यांनी केली आहे. यापूर्वी त्यांनी ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत फेटा घालणार नाही, असे घोषित केले होते.

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती : २६ जणांचा मृत्यू

राज्यातील पठाणमथिट्टा, कोट्टायम्, एर्नाकुलम्, इडुक्की आणि त्रिशूर या ५ जिल्ह्यांना अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे.

सिरूवाचूर (तामिळनाडू) येथे कालीअम्मन मंदिराच्या परिसरातील हिंदूंच्या देवतांच्या १४ मूर्तींची तोडफोड !

तामिळनाडूत हिंदुद्वेषी द्रमुक पक्ष सत्तेत असल्यामुळे तेथे हिंदूंद्वेष्ट्यांवर काही कारवाई होईल, अशी अपेक्षा नाही. तमिळनाडूत हिंदु धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन हवे !