चीनमध्ये सरकारच्या आदेशानंतर ‘अ‍ॅपल’ आस्थापनाने त्याच्या ‘स्टोअर’वरून ‘कुराण’ अ‍ॅप हटवले !

हे अ‍ॅप हटवण्यापूर्वी चीनमधील १० लाख लोक त्याचा वापर करत होते. जगभरात ३ कोटी ५० लाख लोक या अ‍ॅपचा वापर करत आहेत.

पोलिसांशी वाद घातल्यानंतर धर्मांधांकडून स्वतःच्याच धार्मिक मिरवणुकीच्या वेळी हिंसाचार

‘भारतात अल्पसंख्यांकांना भयाच्या सावटाखाली रहावे लागते’, अशी ओरड करणारे हिंदूबहुल भारतात हिंदूंनाच अल्पसंख्यांकांच्या भयाच्या सावटाखाली रहावे लागत असल्याच्या वस्तूस्थितीविषयी चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

गुंड टोळ्यांशी संबंध ठेवणार्‍या देहली पोलिसांचे दोन शिपाई अटकेत !

स्वतःच्या खात्यातील गुन्हेगारी सहकार्‍यांना ओळखू न शकणारे पोलीस समाजातील गुंडांना कसे ओळखणार ?

आझमगड (उत्तरप्रदेश) येथील श्री दुर्गादेवीच्या पूजा मंडपात घुसून पिस्तूल दाखवून मूर्ती हटवण्यास सांगणार्‍या धर्मांधाला अटक

उत्तरप्रदेश पाकिस्तानात आहे का ? उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे असे धाडस होतेच कसे ? असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !

ब्रिटनमधील चर्चमध्ये धर्मांधाकडून सत्ताधारी पक्षाच्या खासदाराची चाकू भोसकून हत्या

ब्रिटनमध्ये आतंकवादी आक्रमण

रायपूर (छत्तीसगड) रेल्वे स्थानकावरील स्फोटात सी.आर्.पी.एफ.चे ६ सैनिक घायाळ

रायपूर रेल्वे स्थानकावर एका रेल्वे गाडीमध्ये झालेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सी.आर्.पी.एफ.चे) ६ सैनिक घायाळ झाले. या रेल्वेतून दलाच्या २११ व्या बटालियनचे सैनिक जम्मूला जात होते.

भूक निर्देशांक ठरवण्याची पद्धत अशास्त्रीय असून तो निश्‍चित करण्याच्या कार्यपद्धतीत अनेक गंभीर चुका ! – भारताने निर्देशांक नाकारला !

जर भारताला जाणीवपूर्वक अशा निर्देशांकाद्वारे जागतिक स्तरावर अपकीर्त करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर भारताने प्रखर विरोध करून निर्देशांक फेटाळलेच पाहिजे !

‘अच्छी बाते’ नावाच्या ‘अ‍ॅप’द्वारे जैश-ए-महंमदचा प्रमुख मौलाना मसूद अजहर याच्या जिहादी विचारांचा प्रसार

भारत सरकार या ‘अ‍ॅप’वर कधी बंदी घालणार ? – संपादक नवी देहली – पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादी संघटना ‘जैश-ए-महंमद’चा प्रमुख मौलाना (इस्लामी विद्वान) मसूद अजहर याच्याशी संबंधित ‘अच्छी बाते’ नावाचे अ‍ॅप आहे. ‘गूगल प्ले स्टोअर’ने त्याला शैक्षणिक गटात ठेवले आहे. या अ‍ॅपमधून इस्लामी शिक्षण दिले जात असल्याचा दावा केला जात आहे; मात्र प्रत्यक्षात याद्वारे तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न … Read more

इस्कॉनच्या मंदिरावर आक्रमण करून २ साधू आणि १ भाविक यांची हत्या

पंतप्रधान शेख हसीना यांनी यापूर्वी ‘हिंसाचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे म्हटले होते; मात्र त्याचा कोणताच परिणाम धर्मांधांवर झालेला नाही किंवा शेख हसीना त्यांचे काहीच वाकडे करू शकणार नाहीत, यातूनच हे आक्रमण झाल्याचे लक्षात येते !

सावंतवाडी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या कामाचा प्रारंभ

‘येत्या ३-४ मासांत हे काम पूर्ण केले जाईल’, असा विश्वास सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संजू परब यांनी या वेळी व्यक्त केला.