धर्मांधांनी काढलेला भगवा ध्वज हिंदूंनी एकत्र येऊन पुन्हा त्याच ठिकाणी फडकावला !

कवर्धा (छत्तीसगड) येथे धर्मांधांनी भगवा ध्वज काढल्याचे प्रकरण

पाकिस्तान आतंकवाद पसरवणारा सर्वांत मोठा गुन्हेगार ! – संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकला पुन्हा फटकारले

भारताच्या प्रतिनिधी डॉ. काजल भट म्हणाल्या की, सर्व सदस्य देशांनी आतंकवादाच्या विरोधातील त्यांचे कर्तव्य पार पाडले पाहिजे.

१५ वर्षे जुन्या वाहनांच्या नोंदणीच्या नूतनीकरणाच्या शुल्कामध्ये एप्रिल २०२२ पासून ८ पट वाढ

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने याविषयीची अधिसूचना काढली आहे.

मराठवाडा येथे ५ मुले नदीत बुडाली, चौघांचा मृत्यू !

जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात वानेगाव येथे ६ ऑक्टोबर या दिवशी आजीसमवेत गिरजा नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेली तिघे मुले बुडाली आहेत.

अमेरिकी सैन्याकडे ३ सहस्र ७५० अण्वस्त्रे !

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीनुसार ३० सप्टेंबर २०२० पर्यंत अमेरिकी सैन्याकडे ३ सहस्र ७५० अण्वस्त्रे  होती. त्याआधीच्या वर्षी ही संख्या ३ सहस्र ८०५ होती, तर वर्ष २०१८ मध्ये ३ सहस्र ७८५ अण्वस्त्रे होती.

गेल्या ५० वर्षांच्या काळात दुष्काळामुळे ६ लाख ८० सहस्र लोकांचा मृत्यू ! – जागतिक हवामानशास्त्र संघटना

विज्ञानामुळे झालेली ही ‘प्रगती’ समजायची का ?

चर्च हे देवाचे निवासस्थान असल्याने ते युद्धाचे स्थान बनू नये ! – केरळ उच्च न्यायालय

‘मंदिरांमध्ये गैरव्यवहार होतात’, ‘व्यवस्थापन नीट नाही’, अशी कारणे देऊन त्यांचे सरकारीकरण करणारे शासनकर्ते गटबाजी असणार्‍या चर्चचे सरकारीकरण  करत नाही, हे लक्षात घ्या !

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून दोघा शीख शिक्षकांची शाळेत घुसून हत्या

काश्मीरमध्ये पुन्हा वर्ष १९८९ प्रमाणे हिंदू आणि मुसलमान यांना लक्ष्य केले जात आहे. ‘प्रतिदिन १ – २ आतंकवादी ठार होत असल्याने काश्मीरमधील आतंकवाद संपण्याच्या स्थितीत आहे’, असे सांगणारे जनतेला मूर्ख बनवत आहेत, हे यातून लक्षात येते !

जागतिक आरोग्य संघटनेकडून मलेरियावरील पहिल्या लसीला संमती

जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिली मलेरिया प्रतिबंधात्मक लस ‘आर्टीएस्, एस/एएस्०१’ला मान्यता दिली आहे. मलेरियामुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या आफ्रिकी देशांना प्रथम ही लस देण्यात येणार आहे.

आरोपींवर काय कारवाई केली, याविषयीचा अहवाल सादर करा ! – सर्वोच्च न्यायालयाचा उत्तरप्रदेश सरकारला आदेश

लखीमपूर खीरी येथील हिंसाचाराच्या प्रकरणातील आरोपींवर काही कारवाई झाली आहे कि नाही याविषयीचा अहवाल सादर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने उत्तरप्रदेश सरकारला दिला आहे. या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे.