सनातनचे प्रेरणास्थान प.पू. रामानंद महाराज यांची जयंती भावपूर्ण वातावरणात साजरी !

येथील ‘भक्तवात्सल्याश्रमा’मध्ये १७ ऑक्टोबर या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी आणि सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. रामानंद महाराज यांची जयंती कोरोनाविषयीचे नियम पाळून भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

इस्लाम हा आमच्या देशाचा धर्म नाही ! – बांगलादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन

बांगलादेश हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. इथे प्रत्येकाला स्वत:च्या श्रद्धा जोपासण्याचा अधिकार आहे. इस्लाम हा आमच्या देशाचा धर्म नाही, असे विधान बांगलादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांच्या विषयी बोलतांना म्हटले आहे.

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाचा ‘दक्षिण आफ्रिका हिंदु महासभे’कडून निषेध

बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांत हिंदू, नवरात्रोत्सव मंडप आणि श्री दुर्गादेवीच्या मूर्ती यांवर झालेल्या आक्रमणाचा ‘दक्षिण आफ्रिका हिंदु महासभे’ने निषेध केला आहे. ‘बांगलादेश सरकारने आरोपींवर तात्काळ कारवाई करून पीडितांना न्याय द्यावा, तसेच पीडितांची सुरक्षा आणि त्यांना पूजा करण्याचे स्वातंत्र्य मिळावे….

बांगलादेश येथील दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई व्हावी !

हिंदूंवर आक्रमण करणार्‍या दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशा मागणीचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आजरा येथे तहसीलदार विकास आहिर यांना देण्यात आले.

भाजपचे १५-२० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात ! – यशवंत जाधव, स्थायी समिती सदस्य, शिवसेना, मुंबई महानगरपालिका

मुंबईतील नगरसेवक भाजपच्या नेतृत्वाला कंटाळले आहेत. त्यामुळे ते शिवसेनेमध्ये येण्याच्या सिद्धतेत आहेत. भाजपचे १५-२० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात आहेत, असे वक्तव्य मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य यशवंत जाधव यांनी १८ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषदेत केले.

पुणे जिल्ह्यात फ्लू रुग्णांच्या संख्येत यंदा लक्षणीय वाढ !

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ‘इन्फ्लूएंझा’ या विषाणूमुळे होणा‍र्‍या फ्लू आणि फ्लूसदृश विकारांचे प्रमाण वाढले आहे. यासाठीची लस उपलब्ध आहे; मात्र लस घेतल्यावर ताप, अंग दुखणे किंवा हातावर येणारी सूज यांसारख्या दुष्परिणामांची भीती बाळगून अनेक नागरिक लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत.

राज्याची आर्थिक स्थिती पूर्ववत् होण्यासाठी किमान ६ मास करभरणा असाच रहावा लागेल ! – राजगोपाल देवरा, प्रधान सचिव, वित्त विभाग

राज्याची आर्थिक स्थिती सुधारत आहे. कराचा भरणा वाढत आहे. प्रत्येक वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये हा भरणा वाढतो. आर्थिक स्थिती पूर्ववत् होण्यासाठी किमान ६ मास ही आवक अशीच रहावी लागेल.

२२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे चालू होणार !

कोरोनामुळे राज्यात बंद असलेली चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे ५० टक्के प्रेक्षक क्षमतेच्या मर्यादेत २२ ऑक्टोबरपासून चालू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. चित्रपटगृहे चालू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशन’च्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

नागपूर येथे धान्याची चोरी करणार्‍या ४ आरोपींना अटक !

येथे जरीपटका पोलिसांनी २६ लाख रुपयांच्या धान्याची चोरी करणार्‍या एका टोळीतील ४ आरोपींना अटक केली आहे, तसेच धान्य जप्त करण्यात आले आहे. सरकारी गोदामातून धान्य घेऊन निघालेले वाहन मधेच अडवून त्यातील धान्य काढून घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.

चांगली कामगिरी नसलेल्या भाजपच्या नगरसेवकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय ! 

येथील महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक पार पडली. चांगली कामगिरी नसलेल्या शहरातील भाजपच्या नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी न देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला आहे