सनातनचे प्रेरणास्थान प.पू. रामानंद महाराज यांची जयंती भावपूर्ण वातावरणात साजरी !

प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे पूजन करतांना श्री. स्वप्निल कापसे आणि सौ. जयश्री कापसे

इंदूर (मध्यप्रदेश) – येथील ‘भक्तवात्सल्याश्रमा’मध्ये १७ ऑक्टोबर या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी आणि सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. रामानंद महाराज यांची जयंती कोरोनाविषयीचे नियम पाळून भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.  या वेळी सकाळी स्तवन मंजिरी आणि रामानंद बावनी म्हणण्यात आली. त्यानंतर श्री. स्वप्निल कापसे आणि सौ. जयश्री कापसे यांच्या हस्ते प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. दुपारी भंडारा आयोजित करण्यात आला, तर सायंकाळी महिला भक्तांकडून गरबा खेळण्यात आला.