बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाचा ‘दक्षिण आफ्रिका हिंदु महासभे’कडून निषेध

  • अशा निषेधासह अशा घटना जगभरात होऊ नयेत, यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन करणे आवश्यक आहे. त्यासाठी जगभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे ! – संपादक 
  • बांगलादेशी हिंदूंवरील आक्रमणाचा असा निषेध भारतातील किती हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केला आहे ? – संपादक 

नवी देहली – बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांत हिंदू, नवरात्रोत्सव मंडप आणि श्री दुर्गादेवीच्या मूर्ती यांवर झालेल्या आक्रमणाचा ‘दक्षिण आफ्रिका हिंदु महासभे’ने निषेध केला आहे. ‘बांगलादेश सरकारने आरोपींवर तात्काळ कारवाई करून पीडितांना न्याय द्यावा, तसेच पीडितांची सुरक्षा आणि त्यांना पूजा करण्याचे स्वातंत्र्य मिळावे, यांसाठी प्रयत्न करावा’, अशी मागणी महासभेने केली आहे.

कोलकाता येथील बांगलादेशाच्या उच्चायुक्तालयाच्या बाहेर ‘इस्कॉन’ संस्थेकडून भजने म्हणून विरोध

बांगलादेशात ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस’ म्हणजे ‘इस्कॉन’ या संस्थेच्या मंदिरावर झालेल्या आक्रमणाला विरोध करण्यासाठी ‘इस्कॉन’च्या अनुयायांनी कोलकाता येथील बांगलादेशच्या उच्चायुक्तालयाबाहेर भजने म्हटली. आरोपींवर त्वरित कठोर कारवाई करावी, तसेच हिंदूंना संरक्षण द्यावे, अशा मागण्याही त्यांनी या वेळी केली.