भाजपचे १५-२० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात ! – यशवंत जाधव, स्थायी समिती सदस्य, शिवसेना, मुंबई महानगरपालिका

मुंबई – मुंबईतील नगरसेवक भाजपच्या नेतृत्वाला कंटाळले आहेत. त्यामुळे ते शिवसेनेमध्ये येण्याच्या सिद्धतेत आहेत. भाजपचे १५-२० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात आहेत, असे वक्तव्य मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य यशवंत जाधव यांनी १८ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषदेत केले. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीतील स्पर्धक पक्ष भाजप आणि शिवसेना यांच्यात एकमेकांवर कुरघोडीचे प्रयत्न चालू आहेत. यशवंत जाधव यांच्या वक्तव्यावर भाजपचे प्रवक्ते आमदार अतुल भातखळकर यांनी ‘भाजपचा एकही नगरसेवक शिवसेनेत जाणार नाही’, असे म्हटले आहे.