इस्लाम हा आमच्या देशाचा धर्म नाही ! – बांगलादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन

ढाका – बांगलादेश हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. इथे प्रत्येकाला स्वत:च्या श्रद्धा जोपासण्याचा अधिकार आहे. इस्लाम हा आमच्या देशाचा धर्म नाही, असे विधान बांगलादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांच्या विषयी बोलतांना म्हटले आहे. मुराद हसन म्हणाले की, बांगलादेश धार्मिक कट्टरतावाद्यांसाठी मोकळे मैदान होऊ शकत नाही. माझ्यामध्ये देशासाठी लढा दिलेल्या स्वातंत्र्ययोद्ध्यांचे रक्त आहे. यासंदर्भात मी संसदेतही बोलणार आहे. यावर कुणीही बोलले नाही, तरी मी त्यावर बोलीन.