लेफ्टनंट कर्नल महिलेचे लैंगिक शोषण करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ब्रिगेडियरवर गुन्हा नोंद !

येथील ‘मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूल’मध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या लेफ्टनंट कर्नल महिलेशी एका ब्रिगेडियरने अनैतिक संबंध ठेवले. त्याने महिलेची अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ (चलचित्र) बनवून ते प्रसारित करण्याची धमकी दिल्याने तिने आत्महत्या केली.

इतिहास ही यशाची गाथा आणि अपयशाची कहाणी असते ! – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

इतिहास ही यशाची गाथा आणि अपयशाची कहाणी असते. इतिहास अभ्यासल्यामुळे काय चूक आणि काय बरोबर हे समजते. त्यामुळे चुकाही अचूकपणे समजून घेतल्या पाहिजेत आणि संशोधन करून इतिहासाची मांडणी केली पाहिजे, अशी अपेक्षा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली.

आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत परीक्षा केंद्रांवरून गोंधळ !

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या पद भरतीसाठी २४ ऑक्टोबर या दिवशी परीक्षा आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना सभागृह (हॉल) तिकिटावर परीक्षेचे केंद्र अन्य जिल्ह्यांतील आले आहे. गडचिरोलीतील उमेदवारांना पुण्याचे, तर पुण्यातील उमेदवारांना नाशिक, जळगाव येथील परीक्षा केंद्र मिळाले आहे.

बांगलादेशी हिंदूंना वाली कोण ?

काश्मीरमधील वंशविच्छेदाच्या वेळी भारत शांत राहिला; त्याची पुनरावृत्ती बांगलादेशी हिंदूंच्या संदर्भात नको !

सलग तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे सिंहगडावर पर्यटकांची गर्दी !

१५, १६ आणि १७ ऑक्टोबर असे सलग तीन दिवस सुट्या असल्याने सिंहगड आणि खडकवासला चौपाटी परिसरात पर्यटकांनी गर्दी केली होती. या तीन दिवसांत १ सहस्र ९५३ दुचाकी, १ सहस्र ४०२ चारचाकी, तर ४० खासगी जीप यांमधून अनुमाने १२ सहस्त्रांहून अधिक प्रवासी गडावर गेल्याचा अंदाज आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. प्रमिला रामदास केसरकर (वय ६६ वर्षे) यांचे निधन

मूळ ठाणे येथील असणार्‍या आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्‍या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. प्रमिला रामदास केसरकर (वय ६६ वर्षे) यांचे १८ ऑक्टोबर २०२१ या रात्री १०.३० वाजता निधन झाले. सनातन संस्थेचे कायदेविषयक मानद सल्लागार अधिवक्ता रामदास केसरकर यांच्या त्या पत्नी होत.

वाशी (नवी मुंबई) येथे दुर्गामाता दौडीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांचा उत्साहात सहभाग !

विजयादशमीच्या दिवशी येथील छत्रपती शिवाजी चौक येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पुढाकाराने दुर्गामाता दौड काढण्यात आली. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि धारकरी मिळून ५०० जण या दौडीमध्ये सहभागी झाले होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे नवी मुंबईचे समन्वयक श्री. भरत माळी यांच्या नेतृत्वाखाली ही दौड पार पडली.

सरकारने यावर निर्णय घ्यावा, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

काश्मीरमध्ये पाकपुरस्कृत आतंकवाद्यांकडून होणार्‍या हिंदूंच्या हत्या आणि सैनिकांचे हौतात्म्य पहाता २४ ऑक्टोबरला होणारा ‘टी-२०’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाक सामना रहित करण्यास बीसीसीआयचा नकार.

‘गुरुकृपायोगा’च्या धोपट मार्गा विसरू नको ।

गुरुकृपायोगाच्या माध्यमातून साधना शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

हिंदू एका ध्येयाने संघटित झाले, तर भारत ‘हिंदु राष्ट्र’ घोषित होऊ शकतो ! – विवेक सिन्नरकर, पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारी सदस्य, विश्व हिंदु परिषद

४५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी कुणाला विचारायला गेले नव्हते. त्यांनी मूठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.