पुणे – गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ‘इन्फ्लूएंझा’ या विषाणूमुळे होणार्या फ्लू आणि फ्लूसदृश विकारांचे प्रमाण वाढले आहे. यासाठीची लस उपलब्ध आहे; मात्र लस घेतल्यावर ताप, अंग दुखणे किंवा हातावर येणारी सूज यांसारख्या दुष्परिणामांची भीती बाळगून अनेक नागरिक लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. लस प्रतिवर्षी घेतली असता फ्लू प्रकारातील ताप आणि त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत टाळता येईल, असे आवाहन तज्ञ आधुनिक वैद्यांनी केले आहे. त्यामुळे फ्लूचा धोका टाळण्यासाठी लस घेणे उपयुक्त आहे.