नागपूर येथे धान्याची चोरी करणार्‍या ४ आरोपींना अटक !

२६ लाख रुपयांचा माल जप्त !

राज्यात सक्रीय असणार्‍या सर्व ठिकाणांच्या धान्य माफियांना शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर – येथे जरीपटका पोलिसांनी २६ लाख रुपयांच्या धान्याची चोरी करणार्‍या एका टोळीतील ४ आरोपींना अटक केली आहे, तसेच धान्य जप्त करण्यात आले आहे. सरकारी गोदामातून धान्य घेऊन निघालेले वाहन मधेच अडवून त्यातील धान्य काढून घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकाराची गंभीर नोंद घेतली आहे. पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या वतीने धान्य चोरीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असे त्यांनी सांगितले.