सावंतवाडी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या कामाचा प्रारंभ

प्रातिनिधिक छायाचित्र

सावंतवाडी – येथील जगन्नाथराव भोसले उद्यानात उभारण्यात येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या कामाला १५ ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी भाजपचे माजी खासदार नीलेश राणे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. ‘येत्या ३-४ मासांत हे काम पूर्ण केले जाईल’, असा विश्वास सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संजू परब यांनी या वेळी व्यक्त केला.

या वेळी उपनगराध्यक्षा सौ. अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, आरोग्य सभापती सुधीर आडीवडेकर आदी उपस्थित होते.