आझमगड (उत्तरप्रदेश) येथील श्री दुर्गादेवीच्या पूजा मंडपात घुसून पिस्तूल दाखवून मूर्ती हटवण्यास सांगणार्‍या धर्मांधाला अटक

उत्तरप्रदेश पाकिस्तानात आहे का ? उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे असे धाडस होतेच कसे ? असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो ! – संपादक

अटक करण्यात आलेला धर्मांध अंसार अहमद उपाख्य मिंटू (मध्यभागी)

आझमगड (उत्तरप्रदेश) – उचहुवाँ गावातील अंसार अहमद उपाख्य मिंटू याने हातात पिस्तूल घेऊन गावातील श्री दुर्गादेवीच्या पूजा मंडपात घुसत तेथील मूर्ती हटवण्यासाठी धमकी दिली. याविषयी पूजा समितीने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर अंसारच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली.