इस्कॉनच्या मंदिरावर आक्रमण करून २ साधू आणि १ भाविक यांची हत्या

  • कुराणाचा अवमान झाल्याच्या अफवेचे प्रकरण

  • बांगलादेशमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर २०० हून अधिक धर्मांधांकडून पुन्हा हिंदूंवर आक्रमणे

  • हिंदु कुटुंबातील ३ जणांवर बलात्कार

  • मदरशांतील विद्यार्थ्यांकडून श्री दुर्गादेवी पूजा मंडपावर आक्रमण

  • पंतप्रधान शेख हसीना यांनी यापूर्वी ‘हिंसाचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे म्हटले होते; मात्र त्याचा कोणताच परिणाम धर्मांधांवर झालेला नाही किंवा शेख हसीना त्यांचे काहीच वाकडे करू शकणार नाहीत, यातूनच हे आक्रमण झाल्याचे लक्षात येते ! हे पहाता भारत सरकार हिंदूंच्या रक्षणासाठी काही करणार का ? – संपादक
  • इस्लामी देशांत हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांविषयी भारतातील आणि जगभरातील निधर्मीवादी अन् पुरो(अधो)गामी चमू कधीच काही बोलत नाही. याउलट अशा असंख्य आक्रमणांपासून वाचण्यासाठी आपला जीव मुठीत धरून भारताचा आश्रय घेतलेल्या हिंदूंना शीघ्र गतीने भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी केलेल्या ‘सीएए’ कायद्याला (नागरिकत्व सुधारणा कायद्याला) मात्र हा चमू विरोध करतो, हे लक्षात ठेवा ! – संपादक

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशच्या नौआखाली येथे शुक्रवारच्या नमाजानंतर इस्कॉनच्या एका मंदिरावर २०० हून अधिक धर्मांधांनी आक्रमण करून इस्कॉनचे दोन साधू निताई दास प्रभु आणि जतन दास प्रभु, तसेच २५ वर्षीय भाविक पार्थ दास यांची हत्या केली. दास यांचा मृतदेह येथील तलावाजवळ सापडला. इस्कॉनने ट्वीट करून या आक्रमणाची माहिती दिली. इस्कॉनने बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साहाय्य करण्याचे आवाहन केले आहे. ‘या आक्रमणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी इस्कॉनने केली आहे. नवरात्रीच्या कालावधीत देशातील कॉमिला जिल्ह्यात धर्मांधांनी कुराणाचा अवमान झाल्याच्या अफवेवरून हिंदूंवर आणि श्री दुर्गादेवीच्या ९ पूजा मंडपांवर आक्रमणे करून ४ हिंदूंना ठार केले होते.

इस्कॉनचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते राधारमण दास यांनी ट्वीट करून म्हटले की, पार्थ दास हे बेपत्ता होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी त्यांचा मृतदेह तलावात तरंगतांना दिसला. त्यांना बेदम मारहाण करून अमानुषपणे हत्या केल्याचे लक्षात आले. त्यांच्या शरिरातील काही भाग काढण्यात आल्याचेही आढळून आले. या घटनेपूर्वी हबीबगंज येथे मदरशांतील विद्यार्थ्यांनी श्री दुर्गादेवी पूजा मंडपावर आक्रमण केले. यात एका पोलिसासह २० हिंदू घायाळ झाले.

हिंदु कुटुंबातील तिघांवर धर्मांधांकडून बलात्कार

‘इस्कॉन बांगलादेश’ने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाला ट्वीट करून या आक्रमणामध्ये एका हिंदु कुटुंबातील महिलांवर बलात्कार झाल्याची माहिती दिली आहे. चांदीपूरच्या हाजीगंज येथे धर्मांधांनी एक हिंदु महिला, तिची मुलगी आणि १० वर्षांची पुतणी यांच्यावर बलात्कार केल्याचे या ट्वीटमध्ये सांगण्यात आले आहे.

मंदिराजवळ सापडले १८ बाँब !

बांगलादेशातील इंग्रजी दैनिक ‘द डेली स्टार’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे की, खुलना येथील रूपसा उपजिल्ह्यातील एका मंदिराच्या ठिकाणी १८ बाँबही सापडले आहेत. पोलिसांनी हे बाँब निष्क्रीय केले आहेत.

इस्कॉनच्या उपाध्यक्षांनी आक्रमणांची माहिती देणारे ट्वीट ट्विटरने ‘डिलीट’ करण्यास भाग पाडले !

काही मासांपूर्वी केंद्रशासनाला ‘विचारस्वातंत्र्याचा आदर करा !’, असे उपदेशाचे डोस पाजणार्‍या ट्विटरचा हिंदुद्वेषी दुटप्पीपणा ! – संपादक

श्री. राधारमण दास

इस्कॉनचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते श्री. राधारमण दास यांनी बांगलादेशातील इस्कॉनच्या भक्तांवरील आक्रमणांची माहिती देणारे ट्वीट संबंधित छायाचित्रांसह पोस्ट केली होती. यावर ट्विटरने आक्षेप घेत हे ट्वीट म्हणजे ‘ग्रॅट्युइटस गोर’ (आवश्यक कारण नसतांना रक्ताने माखलेली लोकांची छायाचित्रे पोस्ट करणे) या त्यांच्या धोरणाच्या विरोधात असल्याचे म्हणत दास यांना हे ट्वीट ‘डिलीट’ करण्यास (पुसण्यास) भाग पाडले. (हिंदूंवरील आक्रमणांविषयी जागृती करणे, ट्विटरला अनावश्यक वाटते, हे लक्षात घ्या ! अशा हिंदुद्वेषी ट्विटरच्या विरोधात केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी, असेच व्यथित हिंदु जनतेला वाटते. – संपादक) ट्विटरने श्री. दास यांना हे ट्वीट पुसल्याखेरीजच त्यांचे ट्विटर खाते चालवू दिले जाणार नाही, अशी चेतावणीही दिली. श्री. दास यांनी सदर ट्वीट पुसल्यावर ट्विटरच्या या हिंदुद्वेषासंदर्भात नवे ट्वीट करून सर्वांना ही माहिती दिली आहे. दास म्हणाले, ‘हिंदूंना चहुबाजूंनी घेरले गेले आहे. आम्ही आमच्यावरील आक्रमणांची माहितीही जगाला देऊ शकत नाही.’