रायपूर (छत्तीसगड) रेल्वे स्थानकावरील स्फोटात सी.आर्.पी.एफ.चे ६ सैनिक घायाळ

सी.आर्.पी.एफ.चे घायाळ सैनिक

रायपूर (छत्तीसगड) – रायपूर रेल्वे स्थानकावर एका रेल्वे गाडीमध्ये झालेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सी.आर्.पी.एफ.्चे) ६ सैनिक घायाळ झाले. या रेल्वेतून दलाच्या २११ व्या बटालियनचे सैनिक जम्मूला जात होते. ही गाडी रायपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर थांबली असता ‘डेटोनेटर बॉक्स’मध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली.