पोलिसांशी वाद घातल्यानंतर धर्मांधांकडून स्वतःच्याच धार्मिक मिरवणुकीच्या वेळी हिंसाचार

भयभीत झालेल्या हिंदूंना संरक्षण देण्याची मागणी

  • धर्मांधांच्या धार्मिक मिरवणुकीच्या वेळी ते हिंसाचार का करतात ? हे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी सांगतील का ? – संपादक
  • ‘भारतात अल्पसंख्यांकांना भयाच्या सावटाखाली रहावे लागते’, अशी ओरड करणारे हिंदूबहुल भारतात हिंदूंनाच अल्पसंख्यांकांच्या भयाच्या सावटाखाली रहावे लागत असल्याच्या वस्तूस्थितीविषयी चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक

देहली – दक्षिण देहलीच्या बटुकेश्‍वर (बी.के.) दत्त कॉलनीमध्ये १४ ऑक्टोबरच्या दिवशी धर्मांधांच्या एका धार्मिक मिरवणुकीच्या वेळी त्यांनी देहली पोलिसांशी घातलेल्या वादानंतर हिंसाचार केला. या वेळी पोलिसांनी लावलेले अडथळे (बॅरेकेड्स) तोडून टाकले. या संदर्भातील एक व्हिडिओ भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील यादव यांनी ट्वीट केला आहे. त्यांनी ‘या घटनेमुळे स्थानिक हिंदू घाबरलेले असून त्यांना संरक्षण पुरवावे’, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. याविषयी यादव यांनी ‘#SaveBKDuttPeoples’ नावाने ‘हॅशटॅग ट्रेंड’ (एकाच विषयावर चर्चा घडवून आणणे) केला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असला, तरी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही.
सुनील यादव यांनी सांगितले की, बी.के. दत्त कॉलनी फाळणीच्या वेळी पाकमधून भारतात आलेल्या हिंदूंसाठी वसवण्यात आली होती. येथे पूर्वी मुसलमानांची ४ घरे होती, आता ती ४० हून अधिक घरे झाली आहेत. ती कशी झाली ?, हे कुणालाही ठाऊक नाही. येथे हिंसाचाराच्या वेळी धर्मांधांकडून महिलांना जाणीवपूर्वक पुढे करण्यात आले. या मिरवणुकीमध्ये बाहेरून लोक आली होती. प्रतिवर्षी अशा मिरवणुकीच्या वेळी हिंसाचार होतो. (जर प्रतिवर्षी येथे हिंसाचार होतो, तर पोलीस काय करत असतात ? ते हा हिंसाचार रोखू शकत नसतील, तर ते सामन्य जनतेचे रक्षण कसे करणार ? – संपादक)