गुंड टोळ्यांशी संबंध ठेवणार्‍या देहली पोलिसांचे दोन शिपाई अटकेत !

  • गुंड पोलीस ! अशा पोलिसांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा केली पाहिजे ! – संपादक
  • स्वतःच्या खात्यातील गुन्हेगारी सहकार्‍यांना ओळखू न शकणारे पोलीस समाजातील गुंडांना कसे ओळखणार ? – संपादक
प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – येथील रोहिणी सत्र न्यायालयात काही दिवसांपूर्वी एका गुंडाची गोळ्या झाडून झालेल्या हत्येच्या प्रकरणी देहली पोलिसांच्या दोघा शिपायांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही शिपायांचे जितेंद्र गोगी आणि लॉरेंस बिश्‍नोई या टोळ्यांशी गुन्हेगारी स्वरूपाचे संबंध होते. संबंधित गुंडाच्या हत्येसाठी या दोघांनी साहाय्य केल्याचे उघड झाल्याने त्यांना अटक करण्यात आली.