चीनमध्ये सरकारच्या आदेशानंतर ‘अ‍ॅपल’ आस्थापनाने त्याच्या ‘स्टोअर’वरून ‘कुराण’ अ‍ॅप हटवले !

चीन तेथील मुसलमानांवर दडपशाही करत असतांना ५२ पैकी एकही इस्लामी देश त्याला विरोध करत नाही, हे लक्षात घ्या ! दुसरीकडे भारतात मुसलमानांना मारहाण झाल्याची अफवा जरी पसरली, तर या ५२ इस्लामी देशांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना लगेच भारताच्या विरोधात गरळओक चालू करते ! याला भारतियांची आत्मघातकी गांधीगिरीच कारणीभूत आहे ! – संपादक

नवी देहली – चीनने ‘अ‍ॅपल’ या भ्रमणभाष निर्माण करणार्‍या आस्थापनाला त्याच्या ‘स्टोअर’मधून (सर्व अ‍ॅप्स उपलब्ध होण्याच्या अ‍ॅपलने सिद्ध केलेल्या ऑनलाईन ठिकाणावरून) ‘कुराण’ अ‍ॅप हटवण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर ‘अ‍ॅपल’कडून हे अ‍ॅप हटवण्यात आले. कुराण अ‍ॅप जगभरातील मुसलमानांमध्ये प्रसिद्ध आहे. हे अ‍ॅप हटवण्यापूर्वी चीनमधील १० लाख लोक त्याचा वापर करत होते. जगभरात ३ कोटी ५० लाख लोक या अ‍ॅपचा वापर करत आहेत. चीनच्या या कृतीनंतर त्याला विरोधही होऊ लागला आहे. ‘मुस्लिम असोसिएशन ऑफ ब्रिटन’ने याला विरोध केला आहे.