कल्याण येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर अभियंता अटकेत !

अविनाश पांडुरंग भानुशाली

ठाणे, १४ सप्टेंबर (वार्ता.) – मुंबई वडोदरा द्रूतगती महामार्गाच्या निर्मितीप्रक्रियेत बाधित झालेल्यांच्या भूमींचे मूल्यमापन करून अहवाल देण्यासाठी कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता अविनाश पांडुरंग भानुशाली यांना तक्रारदाराकडून १ लाख रुपयांची लाच घेतांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे, तर यापूर्वी त्यांनी तक्रारदाराकडून ४ लाख रुपयांची लाच घेतली होती. (अशा लाचखोरांवर कडक कारवाई करून त्यांची सर्व संपत्ती जप्त केल्यासच इतरांवर जरब बसेल.  – संपादक)