कोरोना उपचारासाठी ‘अणु तेल’ हे आयुर्वेदाचे औषध प्रभावी ! – नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड

  • नाकामध्ये अणु तेल घालण्याची पद्धत आयुर्वेदामध्ये सहस्रो वर्षांपूर्वीपासून आहे. तेच आताचे विज्ञान सांगत आहे. यातून आयुर्वेदाचे महत्त्व लक्षात येते !
  • हिंदूंना ‘गोमूत्र पिणारे’ आणि ‘रानटी संस्कृतीचे लोक’ म्हणून हिणवणारी अन् हिंदुत्वाचे उच्चाटन करण्यासाठी सरसावलेली विद्वान मंडळी आता चकार शब्दही काढणार नाहीत, हे लक्षात घ्या !

नवी देहली – ‘नॅशनल मेडिसिननल प्लांट बोर्ड’ने (राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने) कोरोना प्रतिबंधक उपचार पद्धत म्हणून नाकामध्ये अणु तेल किंवा तिळाचे तेल घालावे, असे सांगितले आहे. रोगप्रतिबंधासमवेतच रोगाची तीव्रता न्यून करण्यासाठी या तेलांचा उपयोग केल्यानंतर फुफ्फुसांमधील विषाणूंचे प्रमाण अल्प होऊन न्यूमोनियाच्या तीव्रतेत घट होत असल्याचे दिसून आले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग श्‍वासनलिकेत वरच्या भागात चालू होतो. या संसर्गामुळे रुग्णाच्या फुफ्फुसांवर परिणाम होऊन त्याला श्‍वास घ्यायला त्रास होतो. यावर उपाय म्हणून श्‍वासनलिकेत या विषाणूने प्रवेश करू नये, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. यासाठी नाकात अणु तेल किंवा तिळाचे तेल घालावे, असे सदर मंडळाने सांगितले आहे. अणु तेल वापरणार्‍या कोरोनाच्या रुग्णांमध्ये तेल न वापरता उपचार घेणार्‍या रुग्णांपेक्षा फुफ्फुसांमधील संसर्ग अल्प झाल्याचे आढळून आले आहे; मात्र तिळाचे तेल उपायांसाठी वापरलेल्या रुग्णांच्या फुफ्फुसांतील संसर्गात अधिक प्रमाणात फरक पडला नाही. अणु तेलाच्या उपचाराने मात्र विषाणूंचे प्रमाण अल्प होऊन रोगाची तीव्रताही अल्प झाल्याचे दिसून आले.