कोडगु (कर्नाटक) येथील ‘राजीव गांधी राष्ट्रीय उद्याना’चे नाव पालटून ‘जनरल  करिअप्पा’ ठेवण्याची मागणी

वास्तविक राष्ट्रप्रेमींना अशी मागणी करावी लागू नये. सरकारने स्वतःहून अशी कृती करणे अपेक्षित आहे !

डावीकडून जनरल करियप्पा आणि राजीव गांधी

कोडगु (कर्नाटक) – येथील स्थानिकांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालय यांना पत्र पाठवून येथील ‘राजीव गांधी राष्ट्रीय उद्याना’चे नाव पालटून ‘जनरल करियप्पा राष्ट्रीय उद्यान’ करण्याची मागणी केली आहे. फील्ड मार्शल के.एम्. करिअप्पा कोडगु येथील रहिवासी होते. येथील राष्ट्रप्रेमी नवीन मंडपा आणि विनय कायपंडा यांनी हे पत्र पाठवले असून त्यावर ६ सहस्रांहून लोकांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत. फिल्ड मार्शल करिअप्पा भारतीय सैन्याचे पहिले कमांडर-इन-चीफ होते. त्यांनी वर्ष १९४७ मध्ये भारत आणि पाक युद्धाच्या वेळी पश्‍चिम सीमेवर नेतृत्व केले होते.